महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
कृषी महत्वाच्या बातम्या

नंदुरबारचा कांदा परराज्यात तेजीत

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

नंदुरबार/प्रतिनिधी – ऊन,वारा,पाऊस आणि निसर्ग या सर्वांशी लढत शेतकरी आपल्या पिकाची काळजी घेत असतो. शेतकरी आपली शेती तर फार कष्टाने पिकवतो पण त्याच्या पिकाला मिळणारा भाव हा त्याच्या स्वतःच्या हातात नसतो. नंदुरबार मधील शेतकऱ्यांचे चांगले दिवस सुरू होणार असं म्हणायला हरकत नाही. कारण नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असून महाराष्ट्रातील इतर जिल्हयाप्रमाणे बाहेरील राज्यांमधून कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. म्हणून कांद्याचे मार्केट तेजीत सुरू आहे.

नंदुरबार बाजार समितीत रोज तीन ते साडेतीन हजार क्विंटल एवढ्या कांद्याची आवक होत आहे. नंदुरबार तालुक्यामधील ग्रामीण भागातील शेतकरी बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणत असतात. कांद्याला आता सध्या चांगला भाव मिळत असून 10 ते 12 रुपये मोठा कांदा तर लहान कांदा 8 ते 10 रुपये किलोने विकला जात आहे. नंदुरबारच्या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी असून मुंबई, पुणे यासह मध्यप्रदेश गुजरात पश्चिम बंगाल अशा राज्यांमध्ये देखील कांदा विक्रीसाठी नेला जात आहे. आता कांद्याची मोठ्या प्रमाणात बाजारात आवक होत आहे आणि यापुढे कांद्याचे सीजन असंच प्रकारे सुरू राहील पण भाव कमी झाला तर काही शेतकरी हे कांदा साठवून ठेवतात व भाव वाढल्यास तो पुन्हा विक्री करतात त्यामुळे कांद्याचे सिजन वर चढ उतार होत असतो. परंतु आज च्या स्थितीत कांद्याला चांगला भाव मिळत असून मोठ्या प्रमाणात बाजार समितीत कांद्याची आवक होताना दिसत आहे.

Translate »
×