महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
राजकीय

दाढीवाले बाबांच्या कार्यक्रम ठरलेला निर्धार मेळाव्यात नाना पटोलेचे टिकास्त्र

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – राज्यभर निवडणुकीचे वारे वाहताना सध्या दिसत आहे. प्रत्येक पक्ष हा बैठका.सभा कार्यकर्ते मेळावे घेताना दिसत आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने आपली कंबर चागलीच कसलेली दिसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण मध्ये काँग्रेसचा विराट निर्धार मोर्च्या आचार्य अत्रे नाट्यमंदिर येथे पार पडला.या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या आक्रमक विरोधाकानंचा खरपूस समाचार घेतला

गेल्या काही आठवड्यांचा विचार केला तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी एकापाठोपाठ एक सामाजिक तणाव निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांचा एकत्रित विचार केला असता, त्या घडवून आणल्या जात असून मणीपूरसारखी अशांतता महाराष्ट्रात पसरवण्याचा हा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी यावेळी केले.कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या काँग्रेसच्या विराट निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींवर नाव न घेता सडकून टीका केली.


देशात निर्माण झालेले महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा आदी प्रश्नावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आपल्याला भांडवले जात आहे. कर्नाटकमधील विजयाने लोकांच्या मनात हा विश्वास निर्माण केला आहे की काँग्रेसच महागाई कमी करू शकते, काँग्रेसच गरिबांना न्याय देऊ शकते. त्यामुळेच तर सर्व जाती धर्मातील सर्वाधिक मते काँग्रेसला मिळाल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले.ज्याप्रमाणे आज मणीपूर जातीय दंगलींमध्ये जळत आहे. तशीच परिस्थिती महाराष्ट्रातही करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केला.

तर या देशामधील लोकशाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान टिकवायचे असेल तर देशामध्ये काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाहीये. तर भाजपला देशातील जनतेशी काहीही देणे घेणे नसल्याचेच त्यांच्या निती आणि धोरणांवरून दिसून येत आहे. भारताला जगामध्ये बलशाली बनवण्याचे काम काँग्रेस पक्षाने केलं असून आम्हीच निर्माण केलेल्या मालमत्ता विकून मोदी सरकार देशाला खड्ड्यात घालत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केल


तर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर केडीएमसीसाठी ६ हजार ५०० कोटींचे आश्वासन दिले होते. त्याचे पुढे काय झाले? एकही पैसा कल्याण डोंबिवलीत खर्च केला नाही. इथल्या सत्तेच्या माध्यमातून त्यांनी हा पैसा लुटण्याचेच काम केल्याची टीकाही पटोले यांनी केली.

राज्यातील शेतकरी, बेरोजगार, तरुण पिढी असे सर्वच जण नाना पटोले यांच्याकडे आशेने पाहात आहेत. त्यामुळे ते या राज्याचे मुख्यमंत्री पद अतिशय समर्थपणे सांभाळू शकतील असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच कल्याण डोंबिवली शहरांच्या मागासलेपणाला भाजप आणि शिवसेना जबाबदार असल्याचे सांगत आपल्या भाषणात त्यांच्यावर जोरदार टीका केली.

यावेळी युवक काँगेस सरचिटणीस ब्रीज दत्त, महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, प्रदेश सदस्य मुन्ना तिवारी यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या या निर्धार मेळाव्याला लोकांची तुडूंब गर्दी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×