नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – शिक्षक आपल्या समाजातील महत्वाचा घटक आहे. कारण शिक्षक हे फक्त विद्यार्थ्यांनाच घडवत नाहीत तर समाजाला मार्गदर्शन करण्याचे मुख्य कार्य ते वेळोवेळी करत असतात. पण त्यांनाही आपल्या जीवनात अनेक अडचणी येतात. राज्यातील शिक्षकांसमोर जुनी पेन्शन योजना, शिक्षक भरती, सरकारी शाळांतील दुरव्यवस्था अशा अनेक समस्या आहेत. त्याचबरोबर शिक्षकांच्या काही मागण्या ही आहेत.
कल्याणात शिक्षक मेळावा तसेच चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते . या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. मतदारांची टक्केवारी घसरू नये तसेच शिक्षकांना दररोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणी या आणि अशा अनेक प्रश्नांवर या मेळाव्यात चर्चा करण्यात आली. डॉक्टरांच्या पुढे डीआर असे लागते, इंजिनियरच्या नावाआधी ईआर असे लागते. त्याप्रमाणे आता शिक्षकांच्या नावापुढे टीआर असे लावता येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
शिक्षकांचा मान सन्मान वाढावा यासाठी त्यांच्या नावापुढे टीआर लावण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. शिक्षक आपल्या वाहनावर टीआर असे लिहू शकतो. जेणेकरून समोरच्या व्यक्तीला या गाडीत शिक्षकाची असल्याचे समजेल. शिक्षकाच्या घराबाहेरील पाटीवर देखील टी आर लावता येईल अशा पद्धतीचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. त्यामुळे शिक्षकांचा मान सन्मान वाढेल असे मत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केले. आचार संहिता संपल्यानंतर टीआर चे चिन्ह देखील शिक्षक आयुक्तांकडून प्रसारित होईल अशी माहिती त्यांनी दिली.