नागपूर/प्रतिनिधी – जल, वायू प्रदूषणाच्या जोडीने आता ध्वनी प्रदूषणही वाढत आहे. देशातील रस्त्यावरून दररोज असंख्य गाड्या पळतात. त्यामुळे हॉर्नच्या अति वापराने ध्वनी प्रदूषण होते. विशेष करून वयोवृद्ध नागरिकांना हॉर्नमुळे त्रास होतो. या समस्येवर अजून काहीच तोडगा निघाला नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. नागपूर शहरातील वाढती वाहतूक आणि त्यानंतर हॉर्नच्या कर्कश आवाजामुळे होणारे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांनी अभियान सुरू केलं आहे.
नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या पुढाकाराने ‘नो हॉर्न’ अभियान राबवण्यात आले. शहरातील वाहतूक पोलिस आणि स्वयंसेवी संस्थेच्या वतीने नो हॉर्न फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आले आहे. नागपूर शहरातीचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी शहरातील महामार्गावर हे अभियान राबवले. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनीही हातात फलक घेत वाहन चालकांना हॉर्नच्या अति वापरामुळे होणारे दुष्परिणाम सांगितले. या अभियानामुळे नक्कीच वाहन चालकांवर चांगला प्रभाव पडेल. शिवाय ध्वनी प्रदूषणासह अपघात सुद्धा काही अंशी कमी होईल. मी स्वतः अनेक वर्ष्यांपासून हॉर्नचा उपयोग केलेला नाही. असे नागपूर पोलीस आयुत रवींद्रकुमार सिंघल म्हणाले.