महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर

मुंडे साहेबांचा वारसा हा कोणत्याही संपत्तीचा नसून तुमचा स्वाभिमान कायम ठेवण्याचा आहे – पंकजा मुंडे

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

बीड/प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या राजकारणात पंकजा मुंडे हे नेहमीच चर्चेत असणारे नाव आहे. मग कारण हे वैयक्तिक असो किंवा राजकीय. पंकजा मुंडे यांना यावेळेस बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. आता पंकजा मुंडे यांना खासदार करण्यासाठी जिल्ह्यातील महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाइं, रासप, कवाडे गट या पक्षांतील दिग्गज नेत्यांची फळी मैदानात उतरली आहे.

बीडमध्ये मतदारांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या “राजकारणासाठी लाचार होणारी तुमची लेक नाही. वनवास होता तरी मी लाचार झाले नाही झाले, कुणाच्या दारात गेले नाही खंबीरपणे लढले. तुमच्या स्वाभिमानाला कुठे स्पर्श होऊ दिला नाही. मुंडे साहेबांचा वारसा हा कोणत्याही संपत्तीचा नसून तुमचा स्वाभिमान कायम ठेवण्याचा आहे “असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मतदारांना भावनिक साद घातलीय.

विद्यमान खासदार आणि पंकजा मुंडे यांची बहिण असलेल्या प्रीतम मुंडे यांचा पत्ता पक्षाकडून कापण्यात आला. पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली गेली पण त्यासाठी प्रीतम मुंडे यांना आपली जागा सोडावी लागली. त्या विषई पंकजा मुंडे म्हणाल्या “प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळावी असं मला वाटत होतं मात्र मोदी म्हणाले तुम दिल्ली आ जाओ त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी असेल मुंडे साहेबांनी जी कहाणी अर्धवट सोडली ती माझ्याच हातून पूर्ण होणार असेल म्हणून मी तिथे जाणार असेल” असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भावनिक आव्हान केले.

Translate »
×