नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’ येत्या 16 व 17 नोव्हेंबर रोजी दादर (पू) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मराठी भाषा तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर ग्रंथ विक्री केंद्रास भेट देण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, ग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समितीने केले आहे.
”मुंबई शहर ग्रंथोत्सव 2022”चा कार्यक्रम मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, तिसरा मजला, शारदा मंगल कार्यालय, 172, नायगाव, दादर (पू) येथे होणार आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत या ग्रंथोत्सवात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन, विक्री, ग्रंथदिंडी, परिसंवाद, व्याख्यान, साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, लेखक, साहित्यिकांच्या ग्रंथसंपदासाठी ग्रंथ विक्री केंद्र उभारले जाणार आहेत.
वाचनप्रेमींसाठी ही ग्रंथसंपदा वाचन व खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे शासकीय मुद्रणालयाची विविध प्रकाशने, राज्य मराठी विकास संस्था, दर्शनिका विभाग, साहित्य व संस्कृती मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य, साहित्य अकादमी, राष्ट्रीय पुस्तक न्यास इ. शासकीय संस्थांच्या विक्री केंद्रांचाही या ग्रंथोत्सवात समावेश असणार आहे.
बुधवार दि. 16 नोव्हेंबररोजी सकाळी 9.30 वाजता शालेय विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, नायगाव, दादर (पू) येथून निघणार असून ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, गोविंदजी केणी रोड ते महात्मा फुले रोड तद्नंतर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय रोड मार्गे कार्यक्रम स्थळापर्यंत पोहोचणार आहे. दुपारी 2 ते 3.30 वाजेपर्यंत ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके जन्म शताब्दी वर्षानिमित्त कवी, साहित्यिक प्रवीण दवणे यांचे ‘कवितेतल्या शांताबाई’ या विषयावर व्याख्यान तर दुपारी 4 ते 5.30 वाजेपर्यंत सह्याद्री वाहिनीच्या वृत्त निवेदिका दीपाली केळकर यांच्या मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे आणि समृद्धी दाखवणारा “शब्दांच्या गावा जावे” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरूवार दि. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता मराठीतील दुर्मीळ ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्य शासनाच्या दर्शनिका विभागाचे सचिव डॅा. दिलीप बलसेकर यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 11 वाजता भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने 75 विद्यार्थ्यांना ग्रंथांचे वितरण माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते होईल. सकाळी 11.30 ते 1 वाजेपर्यंत ‘वाचन संस्कृती – काल, आज आणि उद्या’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विभागप्रमुख डॅा. राजेंद्र कुंभार यांचे व्याख्यान आणि त्यानंतर दुपारच्या सत्रात ‘ग्रंथोत्सव का व कशासाठी’ याविषयावर परिसंवाद होणार असून यात ठाणे आणि मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, संजय बनसोडे, बांद्राच्या चेतना व्यवस्थापन महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. सिद्धी जगदाळे व माहिम सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यवाह सुषमा जोशी सहभागी होणार आहेत.
ग्रंथोत्सव कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात ग्रंथालयातील बालसभासद, सर्वसाधारण व ज्येष्ठ नागरिक सभासद, वाचक, पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेत मुंबई केंद्रातील गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्याचा प्रातिनिधिक सत्कार केला जाणार आहे. त्यांनतर ग्रंथोत्सव कार्यक्रमाचा समारोप होईल.
या ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेखक अच्युत गोडबोले असून खासदार राहुल शेवाळे, आमदार कालीदास कोळंबकर, प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर, साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील, सहायक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती आयोजक जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड यांनी दिली आहे.
Related Posts
-
शिवसेना कल्याण शहर प्रमुखपदी सचिन बासरे
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या…
-
भिवंडीतील काँग्रेसचे १६ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल
प्रतिनिधी. भिवंडी - मनपातील काँग्रेसचे तब्बल १६ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात…
-
कल्याणमध्ये शिवसैनिकांकडून भाजपा शहर कार्यालयाची तोडफोड
कल्याण/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी…
-
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये फेरबदल
मुंबई/प्रतिनिधी - भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका मंजूर सुधारित विकास आराखड्यामधील खेळाच्या…
-
ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विविध 18 जिल्ह्यांतील 82…
-
पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेधार्थ सोलापूर शहर कॉंग्रेसची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/o5SFD1pd0xo सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
-
आरोग्यसेतू ॲप’बाबत प्रभावी अंमलबजावणी करा - मुंबई शहर जिल्हाधिकारी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई शहर जिल्ह्यात आरोग्यसेतू ॲपबाबत प्रभावी अंमलबजावणी…
-
शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत केडीएमसीला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील शहर स्वच्छ…
-
शहर स्वच्छतेत कचरावेचक महिलांचे मोलाचे योगदान
प्रतिनिधी. डोंबिवली - शहरात स्वच्छतेत खारीचा वाटा उचणाऱ्या कचरावेचक महिलांचे…
-
सोलापुरात शहर आणि जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी
सोलापूर/प्रतिनिधी- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात विकेंड…
-
कल्याण शहर ज्वेलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी राकेश मुथा यांची निवड
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण- कल्याण शहर आणि आसपासच्या परिसरातील…
-
दहावीच्या परीक्षेसाठी १८ नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारले जाणार
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन…
-
कामगारांसाठी मुंबई शहर कामगार उपायुक्त यांच्यामार्फत विविध उपाययोजना
मुंबई/ प्रतिनिधी - आंतरराज्य, स्थलांतरित कामगार, असंघटित कामगार वर्गासाठी मुंबई…
-
मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
मुंबई – भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर…
-
मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेले मुंबई…
-
१६ तालुक्यात मोबाईल फिवर क्लिनीक सुरू
प्रतिनिधी . यवतमाळ - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आता शहरातून ग्रामीण…
-
मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या…
-
१६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह साजरा होणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात दरवर्षी १० जून रोजी दृष्टी दिन साजरा…
-
महागाई विरोधात शहर काँग्रेस सह युवक काँग्रेस चे महागाई जुमला आंदोलन
अमरावती - देशात वाढत्या पेट्रोल वाढ सह वाढती महागाई विरोधात…
-
पंढरपूर शहर पोलिसांनी विविध गुन्हांची शिताफीने केली उकल
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर- पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने…
-
कल्याण मध्ये १६ एप्रिलला आमदार चषक राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण शहरात पहिल्यांदाच…
-
शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे महिला सुरक्षेसाठी 'दामिनी पथक' सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी -शिरपूर शहर पोलीस…
-
आता सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणीसाठी मुंबई शहर निबंधक कार्यालय सुरू राहणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी…
-
‘मुंबई उपनगर ग्रंथोत्सव २०२२’ चे उत्साहात उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आपल्या जीवनाला वैचारिक दिशा…
-
युक्रेनमध्ये अडकलेल्या मुंबई शहरातील नागरिक, विद्यार्थ्यांनी शहर जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये…
-
दिल्लीत १६-१७ ऑक्टोबरला पहिली राष्ट्रीय कोळसा परिषद आणि प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोळसा मंत्रालयाच्या सहकार्याने…
-
मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
नेशन न्युज मराठी टीम मुंबई/ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य…
-
मुंबईत १६ ते २५ फेब्रुवारी दरम्यान ‘महाखादी एक्स्पो २०२४’
NATION NEWS MARATHI ONLINE मुंबई, दि. ५ : राज्यात खादीला प्रतिष्ठा…
-
आरोग्य विभागातील विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरणार- राजेश टोपे
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर…
-
मदतीच्या नावाखाली १६ नागरिकांचे एटीएम केले रिकामे,आरोपी गजाआड
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - देशभरात दररोज फसवणुकीच्या…
-
ठाणे जिल्ह्यात १६ मार्चपर्यंत उष्ण लहरीचा तडाखा, उष्माघातापासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - ठाणे जिल्ह्याला दि. १६…
-
मुंबई शहर जिल्ह्याच्या २४० कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या…
-
कल्याण एपीएमसीच्या निरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ अटक,परवाना बद्दल करण्यासाठी मागितले १६ हजार
कल्याण/ प्रतिनिधी- कोरोना महामारीत नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असताना सरकारी…
-
सोलापुर शहर जिल्ह्यात ८ मेच्या रात्रीपासून ते १५ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत लॉकडाऊन
सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर शहर व जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाला पायबंद…
-
चोरीचे १६ गुन्हे व मुंबईतून तडीपार असलेला सराईत चोरटा गजाआड,डोंबिवली पोलिसांची कारवाई
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - विविध पोलिस ठाण्यात घरफोडीचे १६ गुन्हे दाखल…
-
महिला फिफा विश्वचषक स्पर्धा आयोजनासाठी यजमान नवी मुंबई शहर सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - जगातील सर्वात लोकप्रिय…
-
ठाणे शहर पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून तीन महिन्यात सुमारे ३६ लाख ९५ हजारांचे अंमली पदार्थ जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत…