कल्याण/प्रतिनिधी –वीज कंपन्यातील कामगार व अभिंयते याना फ्रंट लाईन वर्कर घोषीत करुन सोईसुविधा दया या मागणीसाठी कल्याण परिमंडलासह राज्यभर वीज कामगार, अभिंयते व अधिकारी यांनी निदर्शने केली.
महावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपन्यातील ८६ हजार कामगार, अभिंयते व अधिकारी तसेच ३२ हजार कंञाटी, आऊट-सोर्सिग कामगार व सुरक्षा-रक्षक कर्मचाऱ्यांना फ्रंन्टलाइन वर्कर म्हणून जाहिर करण्याचा प्रस्ताव तिन्ही कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यानी ऊर्जा विभागास एक महिन्यापूर्वी पाठविला असुन ऊर्जा विभागाने आरोग्य विभागास पाठविला माञ आरोग्य विभागाने प्रस्ताव मजुंर करुन मुख्यमंत्री यांची मान्यता घेवुन फ्रंटलाईन वर्कर घोषीत करण्याची प्रक्रिया करणे गरजेचे होते माञ तसे झालेले नाही. गेल्या मार्च पासुन तिन्ही कंपन्यातील चारशेच्या वर कामगार मुत्यु पावले असुन हजारो कामगार बांधित झालेले असुन विविध हाॕस्पिटल मध्ये उपचार घेत आहे.
सोमवारी कल्याण परीमंडळातील सर्व विभागाअंतर्गत वसई, विरार, पालघर, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर १, उल्हासनगर -२, कल्याण पुर्व पश्चिम तसेच डोंबीवली विभाग येथे निदर्शने करण्यात आली. तसेच वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर् म्हणून संबोधण्याच्या निर्णयाबाबतीत टाळाटाळ करणाऱ्या सरकार व प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
कल्याण परिमंडलाचे मुख्यालय तेजश्री या कार्यालयासमोर संयुक्त सचीव काँ. औदुंबर कोकरे, काँ. महादेव गायकवाड, काँ. विक्रम खंडागळे, किशोर जयकर, काँ गणराज वाळींबे. डोंबिवली येथे कॉ. सतीश म्हात्रे, उल्हासनगर येथे कॉ. रेवती धाडवद, कॉ. सुर्यवंशी, कॉ. किर्ती कुमार मुकणे, अशोक बामगुडे आदी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नियमानुसार निदर्शने केली असल्याची माहिती कॉ. जे. आर. पाटील यांनी दिली.