नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर / प्रतिनिधी – सरकारी उद्योगधंद्यांचे खाजगीकरण झाले असताना आता कंत्राटी पद्धतीने प्रशासकीय व इतर कर्मचारी नोकर भरतीचा जी आर निघाला आहे. या राज्य शासनाच्या निर्णया विरोधात अनेक ठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे. संभाजीनगर येथे देखील वंचितच्या वतीने आंदोलन केले गेले. संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्य सरकारने घेतलेल्या खाजगी मार्गाने भरती विरोधात वंचित आघाडी आक्रमक झाली आहे.
शासकीय कर्मचारी भरती शिपाई, परिचारिका, कनिष्ठ अभियंता ही पदे खाजगी कंपन्या मार्फत भरती करण्याचा घेतलेल्या शासन निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी शासन परिपत्रकाची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने होळी करण्यात आली आहे.