नेशन न्यूज मराठी टीम.
कोल्हापूर / प्रतिनिधी – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचा दुसरा हप्ता 400 रुपये तातडीने द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन केले गेले. कोल्हापुरातील ताराराणी चौकातून मोर्चा काढून हे आंदोलन केले गेले आहे.
साखर सहसंचालक कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा धडकला. साखर कारखान्यांनी तातडीने दुसरा हप्ता 400 रुपये द्यावा अन्यथा गप्प बसणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले गेले असून सध्या कोल्हापूर शहरातील कावळा नाका परिसरात अनेक शेतकरी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दाखल झाले होते.