नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड/प्रतिनिधी – नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कालच्या 24 मृ-त्यू प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.त्याच बरोबर आरोग्य विभागाचा भोगळ कारभार समोर येताना दिसला आहे. याच प्रकरणावरून विरोधकही चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकार वर हे सुद्धा सरकारवर संतप्त झाले आहे.
नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कालच्या 24 मृ-त्यू झाल्यानंतर आज सकाळ पर्यंत त्यात 10 मृत्यूची वाढ झाली आहे. या प्रकरणामुळे शिवसेना उबाठा गट आक्रमक झाला आहे. आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करत मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.