नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
नंदूरबार/प्रतिनिधी – उसाला योग्य भाव मिळत नसल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून कारखान्याकडे येणारे उसाचे वाहन रस्त्यावर अडवून आंदोलन केले. कारखान्यांनी उसाचे दर जाहीर न करता ऊस तोडणी सुरू केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
उसाला 2900 रुपये दराची मागणी यावेळी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आली. शहादा तालुक्यातील प्रकाशा गावाजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याकडे जाणारी उसाची वाहने अडवून हे आंदोलन केले.जर उसाला योग्य दर मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.