DESK MARATHI NEWS ONLINE.
संभाजीनगर / प्रतिनिधी – एकीकडे मराठवाडा मुक्तींग्राम निमित्त शासन स्तरावरून लाखो रुपये खर्च करून जोरदार तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे ज्यांनी देशाच्या आणि मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात आपले आयुष्य खर्च केले अशा हुतात्म्यांच्या पाल्यांना आंदोलन करावे लागते आहे.
स्वातंत्र्य सैनिकाच्या वैधकिय अनुदानात वाढ करावी, अमृत महोत्सव निमित्ताने तत्काळ स्वातंत्र्य सैनिकांच्या नोकरीमध्ये अनुशेष भरून काढावा अशा विविध मागण्यांसाठी आज स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने क्रांतीचौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.