नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटर (TMC), आणि वेदांत मेडिकल रिसर्च फाऊंडेशनचा महत्वाकांक्षी उपक्रम, असलेल्या छत्तीसगडच्या रायपूर मधील बाल्को मेडिकल सेंटर (BMC) यांनी आज देशात कर्करोग विषयक सेवेत उत्कृष्टता आणण्यासाठी सामंजस्य करार (MOU) केला आहे. परळच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. आर. ए. बडवे आणि बाल्को मेडिकल सेंटरच्या वैद्यकीय संचालक डॉ. भावना सिरोही यांनी बाल्को मेडिकल सेंटरच्या अध्यक्ष ज्योती अग्रवाल यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
सामंजस्य करारानुसार, बाल्को मेडिकल सेंटर आणि टाटा मेमोरियल सेंटर हे माहितीची देवाणघेवाण आणि कौशल्ये, क्षमता आणि प्रमुख उपक्रम वाढवण्यासाठी एकत्र काम करतील. बाल्को मेडिकल सेंटर हे सर्वोत्कृष्ट तांत्रिक आणि वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटरच्या कौशल्याचा आणि कर्करोगाच्या उपचारातील दशकांच्या अनुभवाचा लाभ घेईल. या सहयोगासह, टाटा मेमोरियल सेंटर छत्तीसगड आणि शेजारील राज्यांमधील रूग्णांसाठी संदर्भ केंद्र म्हणून बाल्को मेडिकल सेंटर चा समावेश करेल. दोन्ही कर्करोग रुग्णालयांनी खालील गोष्टींसाठी परस्पर सहमती दर्शविली आहे:
- कर्करोग उपचारांबद्दल सर्वोत्तम पद्धती आणि विकसित होणारे ज्ञान सामायिक करणे.
- रुग्ण सेवेत उत्कृष्टता आणण्यासाठी बाल्को मेडिकल सेंटर हे नॅशनल कॅन्सर ग्रिड व्हर्च्युअल ट्यूमर बोर्डमध्ये भाग घेईल.
- दोन्ही ठिकाणी निरंतर वैद्यकीय शिक्षण (CME) सत्र आयोजित करणे आणि त्यात सहभागी होणे.
- संयुक्त संशोधन किंवा बहुकेंद्रित चाचण्यांचे आयोजन करणे.
या सहयोगाबद्दल संतोष व्यक्त करत बाल्को मेडिकल सेंटरच्या अध्यक्ष ज्योती अग्रवाल म्हणाल्या, “भारतातील कर्करोग रुग्णसेवेच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा क्षण आहे, जेव्हा टाटा मेमोरिअल सेंटर आणि बाल्को मेडिकल सेंटर माहितीच्या देवाणघेवाणीत भाग घेण्यासाठी एकत्र येत आहेत आणि करुणा, काळजी आणि उपचार या मूल्यांसह कर्करोग रुग्णसेवेत संयुक्तपणे परिवर्तन घडवून आणणार आहेत.
बाल्को मेडिकल सेंटरच्या वैद्यकीय संचालक डॉ भावना सिरोही म्हणाल्या, “ बाल्को मेडिकल सेंटरमध्ये, देशातील कर्करोग रुग्णसेवेत अव्वल ठरण्यासाठी काही सर्वोत्कृष्ट प्रतिभावंत आणि तंत्रज्ञानाचे मिश्रण आहे. बाल्को मेडिकल सेंटरने मध्य भारतात सर्वांगीण आणि जागतिक दर्जाचे कर्करोग उपचार एकाच छताखाली उपलब्ध करून दिले आहेत.
बाल्को मेडिकल सेंटरच्या सहयोगाविषयी बोलताना, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. आर.ए. बडवे म्हणाले, “टाटा मेडिकल सेंटरचा जागतिक स्तरावर कर्करोग रुग्णसेवेत उत्कृष्टता राखण्याचा लौकिक आहे आणि सेवा, संशोधन आणि शिक्षणातील उत्कृष्टतेचा दृष्टिकोन राबवण्यासाठी भारतातील जास्तीत जास्त केंद्रांना सक्षम बनवण्याचा त्यांचा उद्देश आहे. टाटा मेमोरियल सेंटर हे जगातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या कर्करोग केंद्रांपैकी एक आहे, ज्यामध्ये 75 वर्षांपेक्षा जास्त उत्कृष्ट रुग्ण सेवा, उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि नाविन्यपूर्ण कर्करोग संशोधन यांचा समावेश आहे.
अधिक माहिती, www.balcomedicalcentre.com वर उपलब्ध आहे.