Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image चर्चेची बातमी हिरकणी

प्रतिभेला जन्म देणाऱ्या आईचा प्रतिभा जननी पुरस्कार देऊन सन्मान

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – मातृ दिवसच्या निमित्ताने देशाचा पहिला प्रतिभा जननी पुरस्कार यंगस्टर युथ फाऊंडेशन आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) ह्यांच्या वतीने प्रदान करण्यात आला . दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही यंगस्टर युथ फाउंडेशन तर्फे कल्याणच्या यशवंत क्रीडा मैदानात दहा दिवसाचा कल्याण सन्मान महोत्सव आयोजित करण्यात आला. फाऊंडेशनचे अध्यक्ष रुपेश चंद्रकांत भोईर ह्यांच्या कल्पनेतून ह्या वर्षा पासून प्रतिभा जननी पुरस्कार प्रदान करण्याची सुरुवात झाली आणि देशाच्या पहिला प्रतिभा जननी पुरस्कार शबनम सलाम शेख ह्यांना प्रदान करण्यात आला .

कल्याण सन्मान महोत्सवात दर वर्षी कल्याणचे रहिवासी असलेले आणि विभिन्न क्षेत्रात आपले नाव कोरणाऱ्या लोकांचा भव्य दिव्य सत्कार केला जातो . ह्या वर्षी रुपेश भोईर यांच्या संकल्पनेतून प्रतिभेला जन्म देणाऱ्या आईचा सत्कार करण्याचे ठरविले आणि सानिया शेख हिची आई शबनम सलाम शेख ह्यांना पहिला प्रतिभा जननी पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला . यंगस्टर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष रुपेश भोईर ह्यांनी माहिती देताना सांगितले की सानिया शेख ही मुलगी जन्मा पासून दिव्यांग आहे . डॉक्टर्सनी सानियाला स्विमिंग करायला सांगितले आणि सानियाची आईने तिला जीवापाड मेहनत घेउन तिला जलतरण पटू म्हणून घडवले. आणि आज अनेक स्पर्धेमध्ये सानियाच्या नावाने सुवर्ण पदक , कांस्य पदक असे शंभर पेक्षा जास्त पदक आहेत . ह्या मागे सानियाचे आईची मेहनत आहे . म्हणून सानिया सारख्या प्रतिभेला जन्म देणारी आई शबनम शेखला आम्ही आमच्या संस्थे तर्फे प्रतिभा जननी पुरस्कार प्रदान केला आहे. आई प्रयेकाच्या जीवनातील अतिमहत्वाचा घटक आहे.आणि आईच एक अशी व्यक्ती आहे की प्रत्येक पाल्याच्या प्रतिभेला जन्म देऊ शकते.अशी प्रतिक्रिया रुपेश भोईर यांनी दिली.

ह्या सन्मान महोत्सवात राष्ट्रपती पुरस्कार विजेते अपंग विकास महासंघचे अध्यक्ष अशोक भोईर , समाज सेवक जमशेद खान , अनुबंध संस्थेचे विशाल जाधव , सदाशिव चव्हाण , सुलेखनकार अनिल गोवळकर , तलवार बाजीत शिव छत्रपती पुरस्कार विजेती स्नेहल पवार , कुश्तीपटू चैनु लोखंडे , जलतरण पटू अल्पा अविनाश जगताप , आर्य अविनाश जगताप गतिमंद क्रिकेट पटू मन खेमनानी , धावक मोहम्मद शेख आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक काका हरदास ह्यांचा सन्मान करण्यात आला . सदर कार्यक्रमात शिवसेना उप नेते अल्ताफ भाई शेख , शिवसेना जिला प्रमुख विजय साळवी , शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे , शिवसेना विधानसभा संघटक ,रवी कपोते , महिला जिल्हा संघटक सौ विजया ताई पोटे , माजी स्थाई समिती सभापती बाळ हरदास आणि शिवसेना विभाग प्रमुख अरुण बागवे प्रमुख रीत्या उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X