Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
कृषी ताज्या घडामोडी

दुष्काळी पट्ट्यात पाणीटंचाईमुळे करपल्या मोसंबी बागा

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी – जगाचा पोशिंदा म्हणवणाऱ्याला आज रस्त्यावर यायची पाळी आली आहे. निसर्गाने दगा दिल्यामुळे काढणीला आलेला माल नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे निसर्गाची पूजा करणाऱ्या या बळीराजाचा कैवारी कोन असा प्रश्न उपस्थित झालाय. मरठवाड्यातील पाणी समस्या ही काही नवीन नाही. पण यावर्षी वाढत्या उन्हामुळे प्यायला आणि जनावरांना पाजायला पाणी नाही तर पिकांना, फळबागांसाठी पाणी कुठून आणायचे अशा अनेक प्रश्नांनी शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागलाय.

छ.संभाजीनगर मधील अनेक गावात भीषण पाणीटंचाईमुळे पाण्याअभावी फळपिकेही सुकून चालली आहेत. अंतरवाली सराटी येथील शेतकऱ्यांनी फळबागा लावल्या. या झाडांना फळे आली पण पाणी नसल्याने झाडे आणि फळे दोन्ही वाळून गेल्याची माहिती फळ उत्पादक शेतकरी दत्ता जामकर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी भला मोठा खर्च करूनही त्यांच्या पदरी एकही रुपयाचा मोबदला पडलेला नाही. शेतकऱ्यांना अनुदान मिळावे अशी सरकारकडे मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X