महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र

सोलापूर वरून सोळाशेहून अधिक नागरिक विशेष रेल्वेने लखनौस रवाना

प्रतिनिधी .

सोलापूर – लॉकडाऊनमुळे व जिल्ह्यात अडकलेल्या उत्तरप्रदेशमधील 1632 नागरिक आणि विद्यार्थ्यांना घेऊन विशेष रेल्वे लखनौकडे रवाना झाली. जिल्हा प्रशासन, रेल्वे विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून यासाठीचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.
सोलापूर रेल्वे स्थानकावरून आज दुपारी 2:30 वाजता रेल्वे लखनौला रवाना झाली. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त बापू बांगर आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकार्यांनी हिरवा झेंडा दाखविला. सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून या नागरिकांची नाव नोंदणी करून घेऊन त्यांना रेल्वेस्थानकावर बोलविण्यात आले होते. सोशल डिस्टन्स ठेवून प्रवासी नागरिकांची आवश्यक कागदपत्रे तपासणी, थर्मल स्क्रीनिंग करून त्यांना रेल्वे डब्यात बसविण्यात आले.
सोलापूर शहर व जिल्ह्यात असणाऱ्या परप्रांतीय नागरिक यांना त्यांच्या राज्यात सोडण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मजूर, नागरिकांनी पायी न जाता तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केले आहे. याआधी रविवारी सोलापूर रेल्वे स्थानकावरून 1146 नागरिकांना घेऊन ग्वाल्हेरकडे रेल्वे रवाना झाली आहे. आता झारखंड, बिहार आणि राजस्थानला रेल्वेद्वारे सोडण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी परवानगी मिळताच रेल्वे जाईल, अशी माहिती श्री जाधव यांनी दिली.
‘प्रिसिजन’कडून पंधराशे भोजन पाकिटचे वाटप
सोलापुरातील प्रिसिजन उद्योग समूहाकडून आज उत्तर प्रदेशाकडे निघालेल्या रेल्वेतील एकूण पंधराशे नागरिकांना भोजन पाकिटचे वाटप करण्यात आले. प्रिसिजन उद्योग समूहाचे प्रमुख श्री. यतीन शहा, डॉ. सुहासिनी शहा यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे आदित्य गाडगीळ यांनी भोजन पाकिटचे वाटप केले.

Related Posts
Translate »