महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
आरोग्य ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनकडून देशभरात ५० हजारहून अधिक यूनिट रक्त संकलित

नेशन न्यूज मराठी टिम.

कल्याण/प्रतिनिधी –  ’रक्तदान हे केवळ एक सामाजिक कार्य नसून मानवीयतेचा असा एक दिव्य गुण आहे जो योगदानाची भावना दर्शवितो आणि त्यातून रक्ताची नाती निर्माण होतात’ असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी देशभर आयोजित रक्तदान श्रृंखलेच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या ‘मानव एकता दिवस’ समारोहाच्या वेळी विशाल जनसमूदायाला संबोधित करताना व्यक्त केले.  

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव जोगिन्दर सुखीजा यांनी या देशव्यापी रक्तदान अभियानाची माहिती देताना सांगितले, की दिल्ली व एनसीआर येथे 1200 यूनिट तर संपूर्ण भारतवर्षामध्ये 50 हजारहून अधिक रक्त संकलित करण्यात आले. याच महा रक्तदान अभियाना अंतर्गत रविवारी संत निरंकारी सत्संग भवन, मोठा गाव, डोंबिवली येथे 393 तर संत निरंकारी सत्संग भवन, चेंबूर, मुंबई येथे 442 यूनिट आणि सोमवारी नालासोपारा येथील निरंकारी सत्संग भवनात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 734 यूनिट संकलित करण्यात आले. डोंबिवली येथील शिबिरात संकल्प रक्तपेढीने 201 यूनिट तर जे.जे.महानगर रक्तपेढीने 192 यूनिट रक्त संकलित केले.

सद्गुरु माताजींनी मानव परिवाराला संबोधित करताना सांगितले, की रक्तदान हे निष्काम सेवेची अशी एक सुंदर भावना असते ज्यामध्ये सकळीकांच्या भल्याची कामना निहित असते. त्यामध्ये अशी भावना उत्पन्न होत नाही, की केवळ आपले सगे-सोयरे किंवा आपले कुटुंबच महत्वपूर्ण आहे, तर अवघे विश्वच आपला परिवार बनून जाते.  निरंकारी जगतामध्ये ‘मानव एकता दिवस’ युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या प्रेरणादायी शिकवणूकीला समर्पित आहे. त्याबरोबरच सेवेचे पुंज, पूर्ण समर्पित गुरुभक्त चाचा प्रतापसिंह व अन्य महान बलिदानी संतांचेही या दिवशी स्मरण केले जाते. ‘मानव एकता दिवस’ दिनी संपूर्ण देशामध्ये जागोजागी सत्संग समारोह आणि विशाल रूपात रक्तदान शिबिरांच्या श्रृंखलेचे आयोजन केले जाते. त्यानंतर रक्तदान शिबिरांची ही श्रृंखला वर्षभर चालू राहते. 

निरंकारी राजपिता रमितजी यांनी स्वत: रक्तदान करुन याचे प्रत्यक्ष उदाहरण प्रस्तुत केले. याच श्रृंखले अंतर्गत देशभरातील संत निरंकारी मिशनच्या बहुसंख्य शाखांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. रक्त संकलित करणाऱ्या रक्तपेढ्या तसेच या शिबिरांना भेट देणाऱ्या गणमान्य व्यक्तींनी मिशन द्वारे केल्या जाणाऱ्या नि:स्वार्थ सेवांचे कौतुक केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×