महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय लोकप्रिय बातम्या

जागतिक छायाचित्र दिना निमित्त मनसेकडून फोटोग्राफर्सचे मोफत लसीकरण,१५० पेक्षा अधिक फोटोग्राफर्सने घेतला लाभ

डोंबिवली/प्रतिनिधी – आज असणाऱ्या ‘जागतिक छायाचित्र दिना’चे औचित्य साधून मनसे आमदार राजू पाटील यांच्यातर्फे फोटोग्राफर्ससाठी मोफत कोवीड लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. डोंबिवली पूर्वेतील सर्वेश सभागृहात आयोजित या शिबीरात कल्याण-डोंबिवलीसह ठाणे, मुंबईतील अनेक फोटोग्राफर्स सहभागी झाले होते.

गेल्या काही दिवसांमध्ये मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून समाजातील विविध गरजू व्यक्तींसाठी मोफत कोवीड लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. त्यामध्ये घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षाचालक, नाभिक आदी सर्वसामान्य वर्गातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर आज असणाऱ्या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आज फोटोग्राफर्ससाठी आज कोवीड लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. ज्यामध्ये कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुलुंड, अंधेरी, मालाड आदी परिसरातील 150 पेक्षा अधिक फोटोग्राफर्स सहभागी झाले होते.
या लसीकरणाबद्दल राज्य सरकारने अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त करून लस घेतलेल्या फोटोग्राफर्सनी आनंद व्यक्त केला.

यावेळी जिल्हा संघटक हर्षद पाटील, जिल्हा सचिव प्रकाश माने, डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत,अरुण जांभळे, संदीप ( रमा ) म्हात्रे, उपविभाग अध्यक्ष विवेक भणगे, महिला शहर अध्यक्षा मंदा पाटील, माजी नगरसेविका सरोज भोईर, सुमेध्ता थत्ते, प्रतिभा पाटील,श्रीकांत वारंगे, स्मिता भनगे,ओम लोके, प्रेम पाटील, सागर मुळए, विकी चौधरी, संजय सरमळकर, अनिल शेट्टी यासह अनेक मनसैनिकांनी अथक मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×