महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ठाणे मुख्य बातम्या

पोलिस अधिकाऱ्याचे निलंबन करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाचा मोर्चा

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण- आंबिवली मोहने येथील लहुजी नगर मधील मातंग समाजातील महिलांना खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी गांव गुंडांना मदत करण्याच्या हेतूने अश्लिल व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याने त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर आ.जाती कायदयानुसार गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीने हलगी वाजवत कल्याणच्या तहसीलदार कार्यालयावर बेधडक मोर्चा काढण्यात आला.

अखिल भारतीय मातंग संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दिलीप रोकडे यांच्या नेत्तृत्वाखाली, माजी नगरसेवक भीमराव डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली मालनबाई साठे, सुरेश साळवे, चक्रधर घुले, प्रकाश जाधव, गणेश ताटे आदींसह मोठ्या संख्येने मातंग समाजातील नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. कल्याण पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथून या मोर्चाला सुरवात होऊन तहसीलदार कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चेकरेंच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेत आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.  

मोहने लहुजी नगर या वस्तीमध्ये सुमारे २५०० ते ३००० लोकं गेली ४०-४५ वर्षापूर्वीपासून रहात असून या भागात गरीब मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्या ठिकाणी आण्णाभाऊ साठे विद्यालय शाळा निर्माण करण्यात आलेली आहे. या शाळेच्या जागेत मोहने गावातील काही गाव गुंड पार्कीगच्या नावाने जागा बळकावण्याचा प्रयत्न करत असून या जागेबाबतचे प्रकरण दिवाणी न्यायालय कल्याण येथे न्यायप्रविष्ठ आहे. असे असतानाही अशोक पवार यांनी गांव गुंडांना मदत करण्याच्या हेतूनेच मातंग समाजातील महिलांना अश्लिल व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप यावेळी मोर्चेकरांनी केला आहे.   

त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु अद्यापही गांव गुडावर व त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आल्याचे दिसून येत नसल्याने या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून अशोक पवार यांच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करत त्यांना बडतर्फ करून गुन्हा दाखल करण्याची मागणी समस्त मोर्च्याकरी नागरीकांनकडून यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×