महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

मोहोळ पोलिसांनी २८ मे रोजी पकडलेल्या रेशन तांदळाच्या ट्रक प्रकरणी तब्बल १५ दिवसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल

सोलापूर/अशोक कांबळे – मोहोळ पोलिसांनी २८ मे रोजी पकडलेल्या रेशन तांदळाच्या ट्रक प्रकरणी तब्बल १५ दिवसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरवठा विभागाच्या असहकार्यमुळे गुन्हा दाखल करण्यास १५ दिवसाचा विलंब लागला असल्याचे सांगण्यात येते. याबाबत मोहोळ पोलीसांकडून मिळालेल्या माहिती नुसार मालट्रक क्रमांक एम एच १२ ई एफ १३७४ सोलापूरहून रेशन चा तांदूळ घेऊन नगरकडे निघालेला होता. २८ में च्या रात्री सावळेश्वर टोल नाक्याजवळ हॉटेल तुळजाई जवळ मोहोळ पोलीसांनी ट्रक पकडला व मोहोळ पोलीस ठाण्यात आणून लावला . या बाबत गाडीचा ड्रायव्हर हरीदास माळी याच्याकडे गाडीतील तांदळा बाबत चौकशी केली असता दयानंद कॉलेजच्या पाठीमागील जागेत असलेल्या पत्राशेड गोडाऊनमधून भरला असल्याचे माळी याने पोलिसांना सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता कलबर्गी ट्रेडर्स सोलापूर पावती क्रमांक ४२७ श्री गजानन ॲग्रो सेल्स सुपा जि.नगर अशी पावती दिली असल्याचे माळी याने सांगितले.गाडीमध्ये एकुण ४०० पिशव्या वजन २०१५ एकुण ४ लाख २९ हजार ५६८ रुपये इतक्या किंमतीचा असल्याचे नमूद करण्यात आले होते .

याबाबत मोहोळ पोलीसांनी मोहोळ येथील पुरवठा विभागाकडे लेखी पत्र लिहून हा तांदूळ रेशन चाच आहे का, कसे ? याबाबत अहवाल देण्यास सांगितले होते. पुरवठा विभागाचे पुरवठा परिक्षक अधिकारी संदीप गायकवाड व तालुका पुरवठा अधिकारी बिजर्गी यांनी यांनी सदर तांदळाचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेकडे पाठविले असुन याबाबतचा अहवाल आल्या नंतर कळविले जाईले असे पोलिसांना सांगितले होते. परंतु १५ दिवसानंतरही पुरवठा विभागाचा कोणताही अहवाल मोहोळ ठाण्याला प्राप्त झाला नाही. पुरवठा विभागाकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नसल्याने मोहोळ पोलीसांनी सदर तांदळाचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत तपासणी साठी पाठविले . त्या प्रयोग शाळेने सदर तांदुळ खाण्ये योग्य असल्याचा अहवाल दिला.

मोहोळ पोलिसांनी दरम्यान सोलापूर येथील व्यापारी सादीक जावेद कलबर्गी , वसीम नसरोद्दीन शेख, अजहर महमंद कलबुर्गी यांना ४ जून रोजी तांदळाचे मालक यांना नोटीस देऊनही त्यांच्या कडून अद्याप पर्यत कुठलेही बील बुक, किंवा ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत त्यामुळे मोहोळ पोलीसांनी १२ जुन रोजी १ ]सादीक कलबुर्गी रा . शेळगी सोलापूर २ ] वसीम शेख रा . जोडभावी पेठ सोलापूर ३ ] अझहर कलबुर्गी रा . जोडभावी पेठ सोलापूर आणि ट्रक ड्राव्हर व मालक हरिदास माळी रा.तुगंत ता.पंढरपुर ट्रंक क्लीनर महेश फडतरे रा. तुंगत ता. पंढरपुर या ५ जणांवरती मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास राजकुमार डुणगे उप निरीक्षक मोहोळ पोलिस स्टेशन मोहोळ हे करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×