नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
सोलापूर/प्रतिनिधी -सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आजपासून पुन्हा नवे वादळ उठण्यास सुरुवात होत असुन एकेकाळी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या राजकारणावर मोठे वर्चस्व असलेलें मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या नेतृत्वात पुन्हा जिल्हयाच्या राजकरणाची सूत्रे हाती घेण्याची तयारी आज अकलूज येथुन सूरू झाली आहे. आज सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार, सुशिलकुमार शिंदे, जयंत पाटील हे अकलूजला शिवरत्न बंगल्यावर येवून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करुन गेले. तर सायंकाळीं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्य उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी पक्ष प्रवेश केला.
या वेळी विजयसिंह मोहिते पाटील,सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे, संजय पाटील घाटनेकर, विठ्ठल कारखानाचे चेअरमन अभिजित पाटील, भारत पाटील, नागेश फाटे,शिवाजी कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर या प्रवेश सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शिवरतन बंगल्यावर माळशिरस, माढा, पंढरपूर, सांगोला, करमाळासह सोलापूर जिल्हयातील मोहिते पाटील समर्थक व महविकास आघाडीचे समर्थक हजारोच्या संख्यने उपस्थीत होते.