नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
संभाजीनगर/प्रतिनिधी – संपूर्ण देशासह महाराष्ट्र भर निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसलेली दिसत आहे. राजकीय पक्षात प्रवेश व फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी सभाही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कन्नड येथे जाहीर सभा घेतली. त्या सभेमधून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ दागत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
सोमनाथ मंदिराची प्रतिष्ठापना देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते झाली होती. आज देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते राम मंदिराची प्रतिष्ठापना का झाली नाही. देशाचे सर्वोच्च जे असतात ते राष्ट्रपती असतात आणि संसद लोकशाही त्यांचे जे प्रमुख असतात संविधानाचे जे प्रमुख असतात. घराणेशाहीचा जो आरोप करत आहेत तर हो आम्ही घराणेशाहीतलेच आहोत. मला अभिमान आहे की, मी बाळासाहेबांचा पुत्र आहे ज्याला त्याला आई-वडिलांचा अभिमान वाटतो. घराणेशाहीबद्दल तुम्ही बोलत असताना मी आणि मी चालणार नाही ही एकाधिकारशाही चालणार नाही आणि हीच एकाधिकारशाही आपल्या देशाच्या मुळावर आलेली आहे. आज अशोक चव्हाण तिकडे गेले आमच्यातले काही तिकडे गेलेले म्हणून सकाळपासून मी सर्व सभेमध्ये सांगत आहे. भाजपने जी घोषणा दिली आहे, काँग्रेस मुक्त भारत कऱणार. आम्ही सांगतो की, भाजप मुक्त भारत आम्ही करणार आहे आणि तुम्ही लिहून ठेवा की एक दिवस भाजपला असा येईल की त्यांच्याकडे व्यक्ती राहणार नाही. भाजप फक्त जातीपातीमध्ये भांडण लावत आहे. वाद निर्माण करत आहे हा आदर्श आहे का आणि ते आदर्श देऊ शकत नाही. असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर केला.
त्याच बरोबर ते हेही म्हणाले की जी शिवसेना पंचवीस तीस वर्ष तुमच्या सोबत राहिली त्यांचं तुम्हाला हिंदुत्व दिसत नाही. संघ संपवण्याची भाषा करणारे नितीश कुमार तुम्हाला चालतात आणि शिवसेनेला संपवायला निघाले तुम्ही खुर्चीसाठी सत्तेसाठी फोडाफोडी करत आहात. मी लढतोय तर तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी माता भगिनींसाठी लढत आहे. मोदी सरकारचा जो दिंडोरा पिटत आहेत, तर मोदी सरकारने सांगावे किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आणि काहीच बोलत नाही. नुसतं मोदी सरकारचा गाजावाजा करत आहेत, काही शेतकऱ्यांनी तर मंडपामध्येच गळफास लावून घेतला. अमरावतीमध्ये उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून त्यांची अंत्ययात्रा दशक्रिया विधी करायचं ठरवलं आणि त्याचं आमंत्रण पंतप्रधानांना दिलं की या आमच्या बांधवांनी आत्महत्या केली आहे. आपण या अतिवृष्टी झाली दुष्काळ झाला की त्यांची नावे येत नाहीत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. एक रुपयात पीक विम्याची घोषणा करतात परंतु शेतकऱ्यापर्यंत अजूनही पोहोचत नाही, अशी टीका यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कन्नड येथील जाहीर सभेत केली आहे.