नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – २०१४ पासून देशभर सुरु असलेल्या राजकीय पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय भूमिका घेणे गरजेचे असताना महाराष्ट्रातील १५० संघटना एकत्र आल्या असून त्यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण ह्यांनी प्रतिक्रिया दिल्या.
विद्या चव्हाण म्हणल्या कि, ३० तारखेला बैठक होणार असून, सर्व संघटना प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. शरद पवार देखील बैठकीत आपली हजेरी लावणार आहेत. मोदी सरकार हे सर्वसामान्यांसाठी त्रासदायक झालं आहे. आता आम्ही भारतीय म्हणून सर्व संघटना पाठींबा देणार आहेत. मेघा पाटकर, तुषार गांधी यांनी पाठिंबा दर्शवला असून ह्या बैठकीस राकेश तिकैत ,डी राजा बैठकीला उपस्थित राहणार आहे.