महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
राजकीय लोकप्रिय बातम्या

मोदींनी महाराष्ट्रातून धनुष्यबाण केला गायब, संजय राऊतांचा बीजेपीवर हल्लाबोल  

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

सांगली /प्रतिनिधी – लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने राजकीय नेते विरोधकांवर अनेक टीका करताना दिसत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मोठा गंभीर आरोप केला.
अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्ष सांगली लोकसभेची जागा लढवत आला आहे. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा सांगितला आणि या जागेवर आपला उमेदवारही जाहीर केला. मात्र, या जागेवरील आपला हक्क सिद्ध करून ही जागा ठाकरे गटाकडून परत मिळवण्यासाठी काँग्रेसच्या जिल्हा आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

संजय राऊत हे आजपासून 3 दिवस सांगली दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील सर्व 48 जागा महाविकास आघाडीच्या आहेत. त्यामुळे त्या फक्त शिवसेना ठाकरे गट किंवा काँग्रेसच्या नाहीत. शिवसेनेचे सर्व जागा जिंकण्याचे स्पष्ट व्हिजन आहे, असे संजय राऊत म्हणाले.

“मोदी आणि शाहांनी अघोरी जादू केली आहे, ज्या धनुष्यबाणावर बाळासाहेबांची श्रद्धा होती तो धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचे अघोरी कृत्य मोदी आणि शाहांनी केलं आहे. ज्यांनी हा धनुष्यबाण घेतला, त्यांना हा धनुष्यबाण वाचवता आला नाही. त्यांनी धनुष्यबाण चोरला त्यांनी शिवसेना चोरली आणि तो चोरीचा माल भाजपने चोरला. महाराष्ट्रातील जनता यांना जाब विचारेल,शिवसेना आणि धनुष्यबाण महाराष्ट्रातून नष्ट करायचं हे त्यांच स्वप्न होतं आणि त्याला हे 40 खोके वाले बळी पडले,तुम्हाला इतिहास माफ करणार नाही”

संजय निरुपम यांच्या विषयी बोलताना राऊत म्हणाले की “कोणी निवडणुकांना कुठे कोणत्या गटाकडून उभं राहायचं हा त्यांचा प्रश्न आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर प्रचंड बहुमताने निवडून येतील.आम्हाला महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे.धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचं भाजपचं अघोरी कृत्य आहे”

राऊत म्हणाले कीसंपूर्ण महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडीच्या प्रचाराला लागलो आहे.वेळ न दवडता आपण मतदारांमध्ये जायला हवं.महाविकास आघाडीचे वातावरण हे झंजावात असावं त्या पद्धतीच दिसत आहे.कोणी कितीही डरकाळी फोडल्या तरी महाविकास आघाडीला कोणी रोखू शकत नाही.सांगलीमध्ये आमचे उमेदवार चंद्रहार पाटील हे फार आधीच प्रचाराला लागले आहेत. मिरजमध्ये शिवसेनाप्रमुखांची प्रचंड मोठी सभा झाली. आदित्य ठाकरे देखील जाणार आहेत. आज, उद्या आणि परवा मी देखील त्या भागात जाणार आहे.मी त्यांच्या भावनेशी सहमत आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात आघाडी असते, तो मतदारसंघ आपल्यासाठी सुटावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते”

पुढे राऊत म्हणाले की “रामटेक हा आमचा परंपरागत मतदारसंघ आहे.आमच्या शिवसैनिकांना वाटत होतं की, तो मतदारसंघ आमच्याकडे असावा.पण आम्ही त्यांची समजूत काढली आणि तो मतदारसंघ काँग्रेसला दिला. छत्रपती शाहू महाराजांचा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला दिला. आमच्याही कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी हट्ट होता.पण आम्ही त्यांची समजूत काढली. आघाडी मध्ये काम करत असताना दुखावलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढावी लागते, सांगलीतलं आणि राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व हे त्या भागातील कार्यकर्त्यांची समजूत काढतील.सांगलीच्या बाबतीत आम्ही काँग्रेसशी अनेक पर्यायांची चर्चा केलेली आहे.पण लोकसभा निवडणूक सांगलीत हे शिवसेनाच लढणार. महाराष्ट्रात किमान 35 प्लस जागा निवडून आणण्याच मिशन आहे,त्यासाठी प्रत्येकाने एकमेकांना हातभार लावला पाहिजे.

Translate »
×