महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

मनसेचे खड्यात बसून आंदोलन, केडीएमसीचे नाव गिनीज बुक मध्ये नोंदवा मनसेचा टोला

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – दरवर्षी पडतो पाऊस दरवर्षी डोंबिवलीतील रस्त्यावर पडती खड्डे असे समीकरण आता या शहरा बाबत जुळले आहे. दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र निर्माण सेने डोंबिवली पूर्वेकडील टिळक पुतळ्याजवळ आंदोलन केले होते. पुन्हा दोन वर्षानी मनसेचे याचा ठिकाणी खड्ड्यात बसून अनोखे आंदोलन केले. सातत्य ठेवत दरवर्षी प्रमाणे शहरात खड्डे ठेवल्याने त्यांचे केडीएमसीचे नाव गिनीज बुक ऑफ रेकोर्ड मध्ये नाव नोंदवल पाहिजे असा टोला मनसेने प्रशासनाला लगावला.

डोंबिवलीतील अनेक रस्त्यावर खड्डेच खड्डेच पडल्याने नागरिकचा नव्हे तर वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागता आहे.कोरोना काळात निवडणुका घेणे शक्य नसल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरु आहे. त्यामुळे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजवावे अशी विनंती नागरिकांनी केली आहे. मात्र पालिका प्रशासनाचे याकडे कलक्ष नसल्याचा आरोप करत मनसेने डोंबिवली पुर्वेकडील टिलक पुतळ्यासमोर आंदोलन केले. मनसैनिकांनी रस्त्यातील खड्ड्यात बसून आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला.यावेळी मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत म्हणाले,कधी ३६० कोटी, कधी ४६०, कधी २५५ कोटी तर कधी ४५५ कोटी आकडे आम्ही एकत आहोत. मात्र रस्त्याचे काम कधी होताना होत नाही. प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठीमनसेने आंदोलन केले. डोंबिवली शहरातील रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून गणपती बाप्पा त्यांना सुबुद्धी देवो. या आंदोलनात डोंबिवली शहर अध्यक्षा मंदा पाटील, प्रतिभा पाटील,सुमेधा थत्ते मानली पेढ्णेकर, रमेश यादव, अरुण जांभळे, संदीप ( रमा ) म्हात्रे, गणेश कदम, ओम लोके, श्रीकांत वारंगे,अनिल वल्हेकर,सुहास काळे,रवी गरुड,विशाल बडे आदिसह अनेक मनसैनिक सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×