मुंबई / प्रतिनिधी – सायन येथील षण्मुखानंद हॉलमध्ये बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते बांधकाम विभागातील अभियंते व कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच काळे झेंडे दाखवण्यात आले. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या कडून षण्मुखानंद हॉल येथे आंदोलन करण्यात आले. ज्या माणसांनी त्या रस्त्याची वाट लावली त्यांचे सत्कार कशासाठी असा सवाल मनसेचे संदीप देशपांडे यांनी केला.
मुंबई गोवा महामार्गत अजूनही खड्डे आहेत आश्वासन देऊन सुद्धा अजून बनले नाहीत यावर मनसे कडून आंदोलन करण्यात आले. माध्यम कर्मी काम करत असताना पोलिसांन कडून धक्का बुक्की करण्यात आली. माध्यम कर्मी यांना खेचण्यात आले त्यांना अडवण्यात येत होते आणि काम करताना काम करू दिले जात नव्हते. पोलिसांकडून दादागिरी करण्यात आली. शिवाय संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना ताब्यात घेण्यात आले.
या आंदोलना संदर्भात प्रतिक्रिया देत मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले कि, काम करत असताना अडथळा आणू नका. मुंबई गोवा महामार्ग रस्ता हा २०२७ पर्यंत पूर्ण करायचा आहे ऑफिशिअली आंदोलन करणाऱ्यांना मी काही अडवणार नाही. १६ ते ३१ तारखे पर्यंत कोकणात जाणाऱ्या रस्त्यांना टोल फ्री करण्यात आला आहे. वाहतुकीला अडथळा येऊ नये याची प्रत्येकाने दखल घेतली पाहिजे. सरकारी मालमत्तेचे नुकसान करू नका असं मी सरकारमधला मंत्री म्हणून आंदोलकांना विनंती केली.
पोलिसांनी माध्यम कर्मीना धक्काबुकी केली. यावर रविद्र चव्हाण म्हणाले कि, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. यासंदर्भात सरकार विनम्रपणे दखल घेईल आणि असं झाल असेल तर हे होणं योग्य नाही.