नेशन न्यूज मराठी टीम.
बीड / प्रतिनिधी – केंद्र व राज्य शासनाकडून नागरिकांच्या सोयीसाठी अनेक योजना कार्यान्वित करण्यात येतात. परंतु त्याच्या अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास मात्र नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. बीड मध्ये घरकुल योजने संदर्भात असा अनुभव लाभार्थ्यांना आला आहे.
बीड मध्ये प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतून मंजूर झालेला घरांचा हप्ता शेकडो लाभार्थ्यांना अद्याप मिळालेला नाही.याच प्रश्नावर मनसेने ठिय्या आंदोलन केले. मनसेच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेसमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात लाभार्थ्यांसह मनसे पदाधिकारी सहभागी झाले होते.घर कुलधारकांचा चौथा हप्ता तात्काळ द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.मागणी मान्य न झाल्यास मनसे स्टाईल तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.