महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
इतर

डोंबिवलीत खासदारांच्या घरासमोरील खड्डे भरण्याच्या कामावर मनसे आमदार याचं ट्विट

प्रतिनिधी.

डोंबिवली – कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांवरून सेने आणि मनसे मध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली आहे. कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटर वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीत ही सहज फेरफटका मारला जेणे करून इथलेही खड्डे लवकरच बुलतील अशी पोस्ट केली होती. या नंतर मनसे आणि सेने मध्ये चांगलीच जुंपली. सेनेचे कल्याण लोकसभेचे खासदार यांनी प्रतिउत्तर देताना आमदारांना टोला लगावला होता की, रस्त्यावर उतरले तर कळेल कामे सुरू आहेत की नाही. परंतु त्यानंतर आमदार राजु पाटील थेट खासदारांच्या बंगल्यासमोरील खड्यांची पाहणी करण्यासाठी गेले होते. या सेना आणि मनसे मध्ये चाललेल्या तू तू मै मै मध्ये आता खासदारांच्या बंगल्यासमोर असलेले खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे. मात्र मनसे आमदार यांनी यावर आज पुन्हा ट्विट करत चिमटा काढला आहे…मनसे आमदार यांनी खासदार घरासमोरील खड्डे बुजवायचा व्हिडिओ ट्विटर टाकून ट्विट केले आहे. म्हणाले आहे की डोंबिवलीत खासदारांच्या घरासमोर खड्डे भरण्याचे काम चालू आहे, तसेच कल्याण-डोंबिवली व संपूर्ण कल्याण लोकसभा क्षेत्रात (सत्ता तुमचीच आहे म्हणून तुम्हीच) पडलेले खड्डे भरण्यास सांगावे.आता यावर खासदार काय उत्तर देतात आणि कल्याण-डोंबिवली रस्त्यावरील खड्डे बुजवले जातील का हे पाहावे लागेल….

Translate »
×