नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराशी प्रसूत झालेल्या महिलेस प्रसूती वेदना सुरु असताना उपस्थित पोलिसांनी विनंती करूनही दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. ह्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा स्थानिक नागरिक व संघटनेकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
घटनेवरुन रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. कोट्यावधी रुपये रुग्णालयावर खर्च केल जातात. त्याठिकाणी एका महिलेची प्रसूती करण्यास स्टाफ साधी तत्परता दाखवू शकत नाही ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे.त्यामुळे मनसे व ठाकरे गटाने रुग्णालयात ठिय्या आंदोलन करत हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावेळी संतप्त आंदोलन कर्त्यांनी स्टाफला जाब विचारला. मनसे आणि ठाकरे गटाची आक्रमक भूमिका घेतली. रुग्णालयातील स्टाफने साधी माणूसकी दाखविली नाही याबबत चर्चा होवून रुग्णालय प्रशासनाच्या या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.