नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण रुग्णालय गेटवर महिलेची प्रसूती प्रकरणी कल्याण डोंबिवली परिसरात सर्व पक्षांच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांकडून डॉक्टरांचा व पालिकेचा निषेध व्यक्त करत संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. मात्र आरोग्य विभागाचे अधिकारी व आयुक्तांनी झालेल्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयात डॉक्टरची कमतरता असल्याने चौकशी होईपर्यंत कारवाई करणे शक्य नसल्याचे सांगत डॉक्टर व कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले आहे.
यावर मनसे पुन्हा एकदा आक्रमक होऊन हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांची पाठ राखण करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना गेटवर अडवल्याने मनसे कार्यकर्त्यांनी गेटवरच गोंधळ घालण्यास सुरुवात केली व आरोग्य अधिकाऱ्याच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला.