प्रतिनिधी.
कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील वायलेनगर मध्ये चौकांना नवी झळाळी मिळणार आहे तब्बल विकासकांच्या मदतीने मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र जवळ महाराजा अग्रसेन चौक आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ महावीर चौकांचे भूमीपूजन स्थानिक आमदारांच्या हस्ते शुक्रवारी सांयकाळी झाले कल्याण पश्चिमेतील वायलेनगर मध्ये विकासकांच्या मदतीने आणि स्थानिक नगरसेविका शालिनी वायले व माजी नगरसेवक सुनिल वायले योगदानाने तब्बल ६० लाखाचे विकास कामाचे भूमिपूजन आ.विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी माजी नगरसेवक सुनिल वायले यांनी विकासकांच्या माध्यमातून परिसरात सुशोभीकरण करून शहराला नवीन झळाळी मिळेल यात तिळमात्र शंका नाही मात्र हीच कामे पालिका प्रशासन कडून मंजूर करतांना नाक्की नऊ येत असते याची खंत वायले यांनी बोलून दाखवली. पालिका प्रशासनाने अशा कामांना गतिशील धोरण अवलंबिले पाहिजे. यावेळी उद्योजक महेश अग्रवाल , राजेश गुप्ता , स्थानिक नगरसेविका शालिनी वायले यांच्या हस्ते ही नारळ फोडून पूजा करण्यात आली कार्यक्रमा प्रसंगी नगरसेविका रंजना व भरत मिरकुटे, विद्याधर भोईर, नगरसेविका विद्या भोईर , निलेश पाटील डॉ सतीश पाटील , साईनाथ तारे आणि शेकडो सेना पदाधिकारीआणि स्थानिक उपस्थित होते.