महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
क्रिडा थोडक्यात

कल्याण मध्ये १६ एप्रिलला आमदार चषक राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धा

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण शहरात पहिल्यांदाच आमदार चषक राष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण तालुका बुद्धिबळ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय स्पर्धा होत आहे. या स्पर्धेमध्ये ग्रँडमास्टर खिताब मिळवणारे आंतरराष्ट्रीय खेळाडूही सहभागी होणार आहेत.

बैल बाजार येथील नवरंग बँकवेट हॉलमध्ये येत्या १६ एप्रिलला सकाळी ९ वाजता या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या धर्तीवर ९ प्रकारांमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धे साठी एक हजार रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. तर ज्या होतकरू खेळाडूंना स्पर्धेत खेळायची इच्छा असेल परंतु आर्थिक परिस्थिती अभावी ते सहभागी होऊ शकत नसतील अशा विद्यार्थ्यांनी आपल्याशी संपर्क साधल्यास आपण त्यांचे प्रवेश शुल्क भरू असे आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केले.

कल्याणात कल्याण तालुका बुद्धिबळ संस्थेच्या माध्यमातून अनेक खेळाडू हे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत या या खेळाडूंच्या कौशल्याला वाव देण्यासाठी आणि या खेळाची आवड असणाऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी ही राष्ट्रीय स्पर्धा भरवण्यात आल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला पहिलं पारितोषिक म्हणून बाईक स्कूटर देण्यात येणार आहे तर त्यासोबतच दोन लाख रकमेची इतर पारितोषिकेही विजेत्यांना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला कल्याण तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, गौरव रे, मोहित लढे, सहर्ष सोमण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×