नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – अपघाताच्या घटना, मृत्यू आणि महिला,लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या संदर्भातील हिंसक घटनांसह हिंसेच्या सर्व घटना यांचे वार्तांकन करताना “योग्य दर्जा आणि सभ्यता” यांना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवणाऱ्या पद्धतीने वार्तांकन करण्याविरोधात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांना सूचना आदेश जारी केला आहे. अशा घटनांच्या संदर्भात विवेक न बाळगता वार्तांकन केल्याच्या अनेक घटना मंत्रालयाच्या निदर्शनास आल्यानंतर या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
मंत्रालयाने म्हटले आहे की, अनेक दूरचित्रवाणी वाहिन्या मृतदेहांच्या तसेच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी व्यक्तींच्या प्रतिमा प्रसारित करत आहेत तसेच समाजातील महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ सदस्य यांच्यासह लोकांना निर्दयपणे मारहाण करतानाची जवळून चित्रित केलेली दृश्ये, शिक्षकांकडून मारण्यात येणाऱ्या मुलांचे सतत रडणे आणि विव्हळणे अशा दृश्यांचे अनेक मिनिटे सतत प्रसारण करण्यात येते आणि असे करताना मुख्य घटनांवर लक्ष केंद्रित व्हावे म्हणून पडद्यावर दाखवताना त्याला गोल करून दाखविण्यात येते, तसेच हे चित्र ब्लर अर्थात अस्पष्ट करण्याची अथवा लांबून दाखवण्याची खबरदारी देखील घेतली जात नाही. अशा प्रकारचे वार्तांकन दर्शकांसाठी त्रासदायक आहे यावर मंत्रालयाने भर दिला आहे.
मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात अशा प्रकारच्या वार्तांकनाचे प्रेक्षकांवर होणारे दुष्परिणाम ठळकपणे नोंदवण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या बातम्यांचा लहान मुलांवर विपरीत मानसिक परिणाम होऊ शकतो असे देखील मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच अशा प्रकारच्या बातम्यांमुळे पीडितांच्या प्रतिमा मलीन, बदनामी या शक्यतेसह व्यक्तीच्या गोपनीयतेवर अतिक्रमण यासारखा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो ही बाब या आदेशात अधोरेखित केली आहे. दूरचित्रवाणीवरुन प्रसारित होणारे कार्यक्रम विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या घराघरांमध्ये, कुटुंबासह, वृद्ध,मध्यमवयीन,लहान मुले अशा सर्व वयोगटातील सदस्यांनी एकत्र मिळून पाहिले जातात. म्हणून या कार्यक्रमांचे प्रसारण करणाऱ्यांमध्ये एक जबाबदारीची भावना तसेच शिस्त असायला हवी आणि ही बाब कार्यक्रम संहिता आणि जाहिरातविषयक संहिता यामध्ये आवर्जून नमूद करण्यात आली आहे असे मंत्रालयाने म्हटले आहे.
मंत्रालयाने वर उल्लेख केलेल्या वार्तांकनातील दृश्ये बहुतेकदा समाज माध्यमांकडून उचलून कोणताही संपादकीय विवेक न बाळगता आणि कार्यक्रम संहितेतील नियमांच्या पालनाची सुनिश्चिती न करता प्रसारित करण्यात आली आहेत याची नोंद मंत्रालयाने घेतली आहे.
अशा प्रकारच्या नुकत्याच प्रसारित करण्यात आलेल्या काही वृत्तांची यादी खाली दिली आहे:
- 30.12.2022 क्रिकेटपटू अपघातग्रस्त झाल्याच्या वेदनादायक प्रतिमा आणि व्हिडिओ ब्लर अर्थात चित्र अस्पष्ट न करता दाखवणे.
- 28.08.2022 एक व्यक्ती एका पीडित मृत व्यक्तीचा मृतदेह ओढत नेत असतानाचे चित्रण आणि रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करणे
- 06-07-2022 बिहार मध्ये पाटणा इथे एका शिकवणी वर्गात एक शिक्षक पाच वर्षांच्या मुलाला तो बेशुद्ध होईपर्यंत निर्दयपणे मारत असल्याची वेदनादायक घटना. हे चित्रण आवाज बंद न करता दाखवण्यात आले ज्यामध्ये तो मुलगा आकांत करत असून यातून सुटण्यासाठी विनवणी करत आहे, हा व्हिडीओ 09 मिनिटांपेक्षा अधिक काळ दाखवण्यात आला.
- 04-06-2022 एका पंजाबी गायकाच्या मृत शरीराच्या विदारक रक्तबंबाळ प्रतिमा चित्र ब्लर न करता दाखवणे.
- 25-05-2022 आसाम मधील चिरांग जिल्ह्यात एक व्यक्ती दोन अल्पवयीन मुलांना काठीने निर्दयपणे मारत असल्याची वेदनादायक घटना दाखवणे. या व्हिडिओ मधील माणूस या मुलांना अतिशय क्रूरपणे काठीने मारत असल्याचे स्पष्ट दिसत होते. हे चित्रण आवाज बंद न करता आणि चित्र अस्पष्ट न करता दाखवण्यात आले ज्यामध्ये वेदनेने रडणाऱ्या मुलांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता.
- 16-05-2022 कर्नाटक मधील बागलकोट जिल्ह्यात एक महिला वकिलाला तिच्या शेजाऱ्याने क्रूरपणे मारहाण केली, ती घटना संपादनाशिवाय सातत्याने दाखवण्यात आली.
- 04-05-2022 तामिळनाडू मध्ये विरुधुनगर जिल्ह्य़ात राजापलायम येथे एक व्यक्ती स्वत:च्या बहिणीची हत्या करताना दाखवत आहे
- 01-05-2022 छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात एका माणसाला एका झाडाला उलटे टांगून पाच व्यक्ती त्याला निर्दयपणे काठीने मारताना दाखवण्यात आले.
- 12-04-2022 एका अपघातादरम्यान मृत पावलेल्या पाच व्यक्तींच्या मृतदेहाचे विदारक चित्र ब्लर न करता सातत्याने दाखवण्यात आले.
- 11-04-2022 केरळ मध्ये कोल्लम इथे एक व्यक्ती आपल्या 84 वर्षांच्या वृद्ध आईला निर्दयपणे मारताना आणि तिला अंगणातून ओढत निर्दयपणे मारहाण करत असताना सुमारे 12 मिनिटे सातत्याने दाखवण्यात आले तेही ब्लर न करता
- 07-04-2022 बेंगळुरूमध्ये एका वृद्ध व्यक्तीने आपल्या मुलाला जाळून टाकल्याचा अत्यंत विचलित करणारा व्हिडिओ. हा वृद्ध माणूस माचिसची काडी पेटवून आपल्या मुलावर फेकतानाचे आणि मुलगा आगीच्या ज्वाळांनी घेरून गेल्याचे चित्रण, संपादित न करता वारंवार प्रसारित केले गेले.
- 22-03-2022 आसाममधील मोरीगाव जिह्यात एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलाला मारहाण करतानाचे दृश्य आवाज बंद न करता आणि चित्र अस्पष्ट न करता दाखवण्यात आले, ज्यामध्ये मुलाचे रडणे आणि गयावया करणे ऐकू येते.
दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या प्रेक्षकवर्गात वयोवृद्ध, महिला आणि मुले यांचा समावेश असल्याने व्यापक जनहिताच्या दृष्टीने अशा प्रसारणाबद्दल चिंता व्यक्त करत, मंत्रालयाने सर्व खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना मृत्यू, गुन्हेगारी, अपघात आणि हिंसाचाराच्या घटनांचे वृत्तांकन करण्याच्या पद्धतींना कार्यक्रम संहितेशी अनुरूप करण्याचा सल्ला दिला आहे.
Related Posts
-
सट्टेबाजीच्या जाहिरातींना परवानगी न देण्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे माध्यमांना निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - माहिती आणि प्रसारण…
-
महावितरणच्या अभियंत्याला मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या खडवली शाखा कार्यालयात…
-
फायबर चे काम करणाऱ्या दुमजली कंपनीला लागली भीषण आग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - घाटकोपर च्या…
-
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सर्वसमावेशक “डिजिटल जाहिरात धोरण, २०२३ ला मान्यता
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- माहिती आणि प्रसारण…
-
तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने…
-
अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या गुजरातच्या तस्कराला बुलढाण्यात बेड्या
नेशन न्यूज मराठी टिम. बुलढाणा/प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे…
-
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या १९ वेबसाईट्स,१० ऍप्स, ५७ सोशल मिडिया हँडल्स केले ब्लॉक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - अश्लील, असभ्य…
-
चैन स्नेचिंग करणाऱ्या आरोपींना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी…
-
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव म्हणून संजय जाजू यांनी स्वीकारला पदभार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - माहिती आणि…
-
ट्रायचे “राष्ट्रीय प्रसारण धोरण” तयारीसाठी सल्लामसलत दस्तऐवज जारी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - माहिती…
-
दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या…
-
बनावट बातम्या प्रसारित करणाऱ्या यूट्यूब वाहिन्यांवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची कारवाई
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - समन्वयाने काम करून …
-
वादळी वाऱ्यात शेतकाम करणाऱ्या महिलेवर वीज पडून मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - हिमायतनगर तालुक्यातील…
-
गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना बेड्या, १७ लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - मेट्रोसिटीमध्ये विक्री करण्यासाठी…
-
राज्यात कौशल्य विकास रथाद्वारे जनजागृती, कौशल्य विकास आणि रोजगाराची माहिती देणार
मुंबई प्रतिनिधी - केंद्र आणि राज्य शासनामार्फत कौशल्य विकासासाठी कोणकोणते…
-
मुंब्रा खाडीत वाळू उपसा करणाऱ्या अवैध बोटीवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - वाळू माफिया…
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या आरोपींना बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - जनावरांच्या कातड्याचा…
-
महाराष्ट्रासह परराज्यात घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून…
-
गांजा तस्करी करणाऱ्या तीन जणांना कल्याण पोलिसांनी ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी. कल्याण - कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस…
-
गेल्या वर्षभरात खोट्या बातम्या पसरवणाऱ्या शंभरहून अधिक यूट्यूब चॅनेल्सवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची कारवाई
नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतात खोटी माहिती पसरवणारी तीन युट्युब चॅनेल्स…
-
कोट्यावधीची फसवणूक करणाऱ्या कंपनीचा मोरक्या पोलिसांच्या जाळ्यात
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली / प्रतिनिधी - गुंतवणूकदारांची सुमारे…
-
कापूस खरेदी न करणाऱ्या जिनिंगची मान्यता रद्द जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
प्रतिनिधी. चंद्रपूर- सोसायटी अॅग्रो प्रोसेअर्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड धानोरा ता.…
-
घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिडको पोलिसांकडून अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - महाराष्ट्रात घरफोडी करणाऱ्या…
-
चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - 'निसर्ग' चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे…
-
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून प्रसारण सेवा विधेयक, २०२३ चा प्रस्ताव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - माहिती आणि…
-
कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेससाठी करमाफी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक…
-
''बंध" विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवाना कोरोनाचा फटका
मिलिंद जाधव भिवंडी - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गर्दी…
-
मंदिरावर कारवाई करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्याची ग्रामस्थाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मोहने गाव परिसरातील जीर्णोद्धार सुरु असलेल्या गावदेवी…
-
माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी- केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच…
-
वीजचोरी करणाऱ्या प्लास्टिक कारखान्याविरुद्ध गुन्हा दाखल
उल्हासनगर/प्रतिनिधी - उल्हासनगरच्या कॅम्प एक भागातील विनायक प्लास्टिक या औद्योगिक…
-
कल्याणात तलाव स्वच्छ करणाऱ्या रोबोटिक मशीनचे प्रात्यक्षिक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - सध्या ए आय म्हणजेच…
-
हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात
मुंबई/प्रतिनिधी - ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४…
-
चुकीची माहिती पसरवल्या बद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची ८ युट्यूब चॅनेलवर बंदी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 नुसार…
-
पत्रकार आणि वैज्ञानिकांना एकत्र आणणारी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची माध्यम आणि संवादक परिषद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - फरिदाबादच्या टीएचएसटीआय…
-
चौकीदाराला ठार करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - गुन्हा हा लहान…
-
चुकीची माहिती पसरवल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने १६ यूट्यूब चॅनलवर घातली बंदी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - माहिती तंत्रज्ञान नियम, 2021…
-
फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण पूर्व…
-
घरफोडी करणाऱ्या आरोपीस आणि रोख रक्कमेचा अपहार करणाऱ्या नोकरास महात्मा फुले चौक पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याणच्या महात्मा फुले चौक…
-
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत टीव्ही वाहिन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - माहिती आणि प्रसारण…
-
कल्याणात मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण येथील एपीएमसी मार्केट परिसरात बुधवारी सकाळी चार…
-
उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधिन करणाऱ्या अधिनियमात सुधारणा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकास कामे…
-
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची आयटी नियम, २०२१ अंतर्गत १० यूट्युब चॅनेलवर बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - माहिती आणि प्रसारण…
-
तीन वर्षाच्या मुलाची विक्री करणाऱ्या वडिलांना बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - दारूच्या आहारी गेलेल्या…
-
मानक चिन्हाचा गैरवापर करणाऱ्या कंपनीवर धाड
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मानक चिन्हाचा गैरवापर…
-
चुकीची माहिती पसरवणाऱ्या २२ यू ट्यूब चॅनेलवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घातली बंदी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने…
-
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या थकबाकीदारांवर गुन्हा दाखल
कल्याण / प्रतिनिधी - थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना…
-
हवेत गोळीबार करणाऱ्या मोबाईल चोरट्यांचा शोध सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये…