सोलापूर प्रतिनिधी- राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे राबविण्यात आलेल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@ सोलापूर या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वतः उपस्थित राहून प्राप्त 871 अर्जांपैकी 786 अर्जांवर सकारात्मक निर्णय घेतला. यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचीही पत्रकार परिषदेत घोषणा केली.
श्री. सामंत यांनी सांगितले की, शुक्रवारी प्रत्यक्ष उपस्थित 576 अर्जांपैकी 480 अर्ज सकारात्मकपणे निकाली काढण्यात आले. यामध्ये अनेक वर्षे प्रलंबित अनुकंपाच्या तीन प्रकरणांमध्ये आज नियुक्ती आदेश देण्यात आले. वैद्यकीय प्रतिपूर्ती दहा व्यक्तींना, भविष्य निर्वाह निधीचे अकरा व्यक्तींना आदेश देण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या आंतरविद्यापीठीय बदल्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये सुलभता आणल्यामुळे सोलापूर जिल्हा विनाअनुदानित तंत्रनिकेतन संघटनेच्यावतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांचे आभार मानण्यात आले.
विद्यापीठामधील चार संविधानिक पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात येणार असून उर्वरित आकृतिबंधालाही लवकरच मान्यता देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी शासनाकडून मदत करण्यात येणार असून विद्यापीठाने प्रस्ताव सादर केल्यास त्याला तत्काळ मंजुरी देण्यात येईल. सोलापूर येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचेही श्री. सामंत यांनी सांगितले.या उपक्रमांतर्गत आलेल्या सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्था चालक, संघटना यांच्या तक्रारीवर प्रत्यक्ष चर्चा करून त्यांनी जागेवर निर्णय घेतले. तक्रारदारांनी याबाबत समाधान व्यक्त केले.
मंत्रालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी, संचालक उपस्थित असल्याने तक्रारदारांच्या समस्या जागेवर सोडविण्यात आल्या. यावेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, प्र. कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, उपसचिव दत्तात्रय कहार आदी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
स्मारक समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री तर कुलगुरू कार्याध्यक्षा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीची घोषणा आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे या समितीचे अध्यक्ष तर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस समितीच्या कार्याध्यक्षा असतील. तसेच या स्मारकामध्ये शिल्पकृती उभारण्यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, मुंबई येथील आणि इतर तज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली उपसमिती गठीत केली जाणार आहे. सात जणांची ही उपसमिती कुलगुरू डॉ. फडणवीस या गठीत करतील. स्मारकासाठी शासनाकडून दीड कोटी तर विद्यापीठ फंडातून दीड कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकूण तीन कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्रासाठी एक कोटींचा निधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्रासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा श्री. सामंत यांनी केली. तसेच महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी 50 लाख रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे.
Related Posts
-
उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय शुक्रवारी सोलापूर विद्यापीठात
सोलापूर - राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 'उच्च…
-
राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे अफगाणी विद्यार्थ्यांना आश्वासन
पुणे/प्रतिनिधी - अफगाणिस्तान देशातील जे विद्यार्थी महाराष्टात शिकायला आहेत त्यांच्या संकटाच्या…
-
सोलापूर महानगरपालिका व संभव फाऊंडेशनच्या वतीने खिळेमुक्त झाड अभियान
सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर महानगर पालिका व संभव फाउंडेशन च्या वतीने…
-
तंत्र शिक्षणातील बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारशींनुसार केंद्र…
-
सोलापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी
प्रतिनिधी. सोलापूर - जिल्ह्यातील सदसंकल्प शिक्षण व समाजसेवा संस्था सोलापूर…
-
राज्यातील ‘प्रवेश प्रक्रिया व आगामी कृषी शिक्षण धोरणा’संदर्भात मंत्रालयात बैठक
मुंबई प्रतिनिधी - कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेची चौथी फेरी महाविद्यालयस्तरावर पार…
-
उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वंकष क्रमवारीत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - उच्च शैक्षणिक क्षेत्रातील सर्वंकष…
-
वंचितचे नगरसेवक गणेश पुजारी यांची सोलापूर महानगरपालिकेच्या मंडई व उद्यान समितीचे सभापती पदी निवड
प्रतिनिधी. सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेच्या विविध सात कमिटीच्या निवडणूक जिल्हा…
-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात,जैवशास्त्र संकुल व सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे उद्घाटन
प्रतिनिधी. सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात नव्याने यंदाच्या…
-
सोलापूर विद्यापीठात टीव्ही व रेडिओ स्टुडिओ आणि पुरातत्व संग्रहालयाचे ऑनलाइन उद्घाटन
सोलापूर प्रतिनिधी- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये टीव्ही व रेडिओ…
-
सोलापूर जिल्ह्यात भीमा, सीना नदी व उजनी धरणाच्या परिसरात बिबट्याची दहशत
सोलापूर/अशोक कांबळे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन केले होते. या…
-
ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी
ठाणे- (संघर्ष गांगुर्डे) जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची…
-
दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात…
-
केडीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षण परीषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शासन परिपत्रकानुसार जि.शि.प्र.स…
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात…
-
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व एशियाटिक सोसायटीतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित होणार डिजिटल
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे आणि…
-
मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीअर्ज व नुतनीकरणासाठी मुदतवाढ
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे…
-
डोमेसाईल दाखल्यावरील INDIA व Citizen of india ही अक्षरे मोठी व गडद करण्याची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - सेतू मधून देण्यात येणार्या डोमेसाईल दाखल्यावरील INDIA…
-
मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु…
-
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी आवाहन
प्रतिनिधी. औरंगाबाद - भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या…
-
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरतीTeam DGIPR द्वारापदाचे नाव – जतन…
-
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाडीबीटी…
-
महाप्रित व आय.आय.टी. मुंबई यांच्यात कार्बन कॅप्चरिंग व ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबाबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
कल्याणातील मराठी शाळेच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद, मोबाईलविना शिक्षण थाबलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले सुरु
कल्याण/प्रतिनिधी -आजच्या इंग्रजीच्या रेट्यातही मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणाऱ्या निवडक…
-
सोलापूर मध्ये ऑक्सिजनचे ८ टँकर दाखल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाच्या प्रभावामुळे अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला…
-
३० व ३१ ऑक्टोबरला एमपीएससी परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी…
-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागतर्फे अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सामाजिक न्याय व विशेष…
-
राष्ट्रीय क्रीडा व साहसी पुरस्कार प्रदान,महाराष्ट्रातील ११ खेळाडू व ३ संस्थांचा समावेश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा कल्याण तथा क्रीडा मंत्री अनुराग…
-
भूदान व ग्रामदान जमिनींसाठी अभ्यास समिती नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील भूदान व ग्रामदान…
-
केडीएमसीच्या शिक्षण विभागामार्फत आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण…
-
डोंबिवली पेंढारकर कॉलेज व घरडा सर्कल परिसरात प्रायोगिक तत्वावर सम विषम व नो पार्किंग
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील…
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात ६१५ खाटांचे रुग्णालय व नवीन पदव्युतर अभ्यासक्रम सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात…
-
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन समिती मार्फत पदवी व पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येणार
मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक वर्षे केवळ कागदावर…
-
भेंडी दिन व भेंडी लागवड प्रशिक्षण संपन्न
कल्याण प्रतिनिधी - कल्याण तालुक्यामध्ये मौजे पोई येथे तालुका कृषी अधिकारी कल्याण यांचे मार्फत भेंडी दिन व शेतकरी प्रशिक्षणनुकतेच…
-
तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय…
-
आदिवासी आश्रम शाळा व कर्मचारी यांचे आंदोलन
नेशन न्यूज' मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - आदिवासी विकास…
-
सोलापूर जिल्ह्यातील मेथवडे ग्रामपंचायतीवर महिला राज
प्रतिनिधी. सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सांगोला तालुक्यातील…
-
संचारबंदीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने घोषित…
-
केडीएमसी शिक्षण विभागाच्यावतीने दिव्यांग बालकांना साहित्य वाटप
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आयटकची संघर्ष यात्रा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/ifbnhFjFUyE?si=qgXi4-znvb1R0NJW रत्नागिरी/प्रतिनिधी - केंद्र व…
-
कर्नाटक सरकारचा निषेध करत एमआयएमचा सोलापूर मध्ये मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/WgIInjbFMLI सोलापूर- कर्नाटक राज्यातील हिजाब वादाचे…
-
शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – “शेतकरी व कष्टकरी जनतेचा…
-
केंद्र व राज्य सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - बीडच्या अंबाजोगाईत…
-
केडीएमसीच्या 'ह' व 'आय' प्रभागातील अनधिकृत बांधकामावर हातोडा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिका…
-
छत्रपती शिक्षण मंडळाच्या विरोधात आरपीआयच्या वतीने ठिय्या आंदोलन
कल्याण प्रतिनिधी- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व समविचारी पक्ष…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण
मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत पोलीस भरतीच्या…