नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी – डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे आयोजित पुस्तक आदान प्रदान सोहळ्यास आजपासून सुरुवात झाली आहे. डोंबिवलीतील संत श्री सावळाराम महाराज क्रिडा संकुलात होणाऱ्या या सोहळ्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान येत्या 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिर सोहळ्यानिमित्त याठिकाणी तब्बल 62 हजार पुस्तकांच्या माध्यमातून श्रीराम मंदिर प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्याचेही अनावरण सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.