प्रतिनिधी
अमरावती – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाव्दारे कामगारांसाठी 19 प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. लोकांची घरे निर्माण होत असताना वीट भट्टीत काम करणाऱ्या कामगारांच्या हातून बनलेली विट बांधकामासाठी प्रथमत: उपयोगात येते. अशा या वीटभट्टी कामगारांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी त्यांची कामगार कल्याण मंडळात नोंदणी होणे आवश्यक आहे. ‘कामगार राज्यमंत्री विटभट्टी कामगारांच्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून वीटभट्टी कामगारांची नोंदणी करुन त्यांना सर्व योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल. कामगारांच्या सुख-समृध्दीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज केले. येथील महादेव खोरी परिसरातील वीटभट्ट्यांवर राज्यमंत्र्यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वीटभट्टी कामगारांना कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचे स्मार्ट कार्ड वितरीत केले.
वऱ्हाड स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र वैद्य, कामगार कल्याण आयुक्त विजयकांत पानबुडे, राज्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी निलेश देठे यांच्यासह परिसरातील वीटभट्टी कामगार आदी उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री श्री. कडू यांनी संगणकासमोर बसून कामगारांची नोंदणी प्रक्रिया व स्मार्ट कार्ड निर्मिती कशी केल्या जाते याचे प्रात्यक्षिक पाहिले. नोंदणी शिबिरात ममता पवार, राजेश वानखडे यांच्यासह अनेकांची नोंदणी करुन त्यांना प्रत्यक्षरित्या स्मार्ट कार्डचे वितरण राज्यमंत्र्यांचे हस्ते वितरीत करण्यात आले. राज्यमंत्री श्री. कडू आणि वऱ्हाड संस्थेच्या पुढाकाराने प्रत्यक्ष वीटभट्टीवर येऊन त्याठिकाणी कामगार म्हणून नोंदणी होऊन स्मार्ट कार्ड मिळाल्याने अनेक कामगारांच्या चेहऱ्यावर हसू आणि समाधान दिसून आले. श्री. कडू म्हणाले की, वीटभट्टीवर काम करणारा कामगार हा स्थलांतरीत असतो. गाव, वस्ती सोडून वीटभट्टयांवर झोपडीत राहून दिवसरात्र काम करीत असतो. रोजच्या दोन वेळेच्या रोजीरोटीसाठी त्याला काम करावे लागते.
अशा या वीटभट्टी कामगारांना सुध्दा कामगार कल्याण मंडळाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा म्हणून कामगार राज्यमंत्री वीटभट्टी कामगारांच्या दारी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. कामगार कल्याण मंडळाव्दारे 19 प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. यामध्ये कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, आजारावर उपचारासाठी अर्थसहाय्य, दिव्यांग कामगार पाल्यांना विशेष सवलत आदी योजनांचा लाभ कामगारांना दिला जातो. मंडळाव्दारे राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ खऱ्या कामगारांना मिळावा, यासाठी व्यापक जनजागृती व संपूर्ण पडताळणी करुन संबंधितांना लाभ देण्यात यावा, असे आदेश त्यांनी कामगार विभागाला दिले. ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात सुमारे 83 हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी 56 हजार हयात आहेत तर 12 हजार कामगारांची योजनेतून आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. इमारत बांधकामामध्ये वीट ही महत्वपूर्ण घटक आहे. अशा घटकाची निर्मिती करणाऱ्या कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ काम करणाऱ्या शेवटच्या घटकापर्यंत पोहाचविण्यासाठी विभागाने जिल्ह्यातील सर्व वीटभट्ट्यांची व तेथील कामगारांची यादी तयार करावी. त्यांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी कश्या पध्दतीने नियोजन करता येईल याचा अहवाल तयार करावा.
कामगारांची नोंदणी करताना जे रोज नियमितपणे कामावर जातात अश्यांसाठी अ वर्गवारी तर जे कधी कधी कामावर जातात अश्यांची ब वर्गवारी तयार करावी. यासंदर्भात राज्यस्तरावर मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव दाखल करण्यात येईल, जेणेकरुन खऱ्या व गरजू कामगारांनाच योजनांचा लाभ पोहोचविता येईल. कामगारांना शासन नावाचा टेकू भेटला पाहीजे, तर हे गरीब कामगार समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकेल, असेही ते यावेळी म्हणाले. येत्या 1 मे कामगार दिनी कामगार मंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण् घेण्यात येईल. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सुमारे 15 हजार वीटभट्टी कामगारांना सर्व योजनांचा एकाच ठिकाणी जागेवर लाभ कसा देता येईल याचे नियोजन केल्या जाईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील रयतेचे राज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहिद भगत सिंग यांच्या स्वप्नातील प्रजासत्ताक राज्य निर्मितीसाठी गोर-गरीब, गरजू कामगारांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
Related Posts
-
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता अनुराधा गोरे यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी. मुंबई - शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील…
-
सिंचन वाढविण्यासाठी जिल्ह्यातील नद्यांचे खोलीकरण व्हावे - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती -जिल्ह्यातील चंद्रभागा, सापन, चारघड, पूर्णा, बिच्छन अशा विविध नद्यांच्या…
-
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्वलित
नेशन न्यूज मराठी टीम. मुरबाड/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांशी लढताना…
-
शेतक-यांना कंपन्यांनी तातडीने नुकसानभरपाई द्यावी - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
प्रतिनिधी. सदोष बियाण्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतक-यांना संबंधित बीज…
-
अचलपूरमध्ये बीओटी तत्वावर १ हजार घरकुले साकारणार - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
प्रतिनिधी . अमरावती - गोरगरीब, गरजू व्यक्तींना हक्काचे घर मिळावे,…
-
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री…
-
रतन इंडिया’च्या कामगारांचे वेतन तत्काळ अदा करा - कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
प्रतिनिधी. अमरावती - नांदगावपेठ येथील रतन इंडिया पॉवर कंपनीच्या कामगारांचे…
-
अतिरिक्त फी आकारणाऱ्या शाळांवर फौजदारी दाखल करण्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश
नागपूर/प्रतिनिधी - कोरोना काळात शाळा बंद असूनही अतिरिक्त बाबींसाठीचे शुल्क…
-
संत गाडगेबाबांच्या दशसूत्री प्रसारासाठी राज्यभर फिरणार संदेशरथ,मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते शुभारंभ
प्रतिनिधी. अमरावती - अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांच्या निर्मूलनासाठी, तसेच समाजजागृतीसाठी…
-
कामगार गुलाम नाही, प्रसंगी त्याच्या सन्मानासाठी लढावे लागले तरी लढू - राज्यमंत्री बच्चू कडू
प्रतिनिधी. मुंबई - कामगार हा कामगार आहे. तो गुलाम नाही.…
-
सहा नद्यांच्या एकत्रीकरणातून जिल्ह्याला ‘सुजलाम सुजलाम’ करण्याचा ध्यास – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू
अमरावती/प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील गोदावरी व तापी खोऱ्यातील सहा नद्या केंद्र…
-
स्मार्ट सिटीमध्ये वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना स्मार्ट पोलिस बूथ उपलब्ध होणार
नेशन न्यूज मराठी टीम. नागपुर/प्रतिनिधी - नागपुरात उन्हाळ्यात तापमान ४५…
-
डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांच्या पुस्तिकेचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. गडहिंग्लज/प्रतिनिधी - ओंकार शिक्षण प्रसारक मंडळ…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
प्रतिनिधी. मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त…
-
‘महायुवा ॲप’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- शासकीय योजना, रोजगार संधी आणि…
-
मनसेचा इशाऱ्यानंतर कामगारांना पुन्हा घेतले कामावर
प्रतिनिधी. अंबरनाथ - अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पीएसार या…
-
सेंचुरी रेयॉन कंपनीतील कामगारांना विक्रमी बोनस
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सेंचुरी रेयॉन कंपनीतील…
-
महावितरणकडून स्मार्ट मीटरची सुरुवात स्वतःपासून
DESK MARATHI NEWS ONLINE. मुंबई/प्रतिनिधी - वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी…
-
स्मार्ट सिटीची मैदाने स्मार्ट कधी होणार ? कल्याणचे वैभव असलेल्या सुभाष मैदानाची दुरवस्था
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/BObmx_tT2wg कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली…
-
क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त…
-
स्मार्ट टॉर्पेडो प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - स्मार्ट कल्पनांचा…
-
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर कल्याणात राष्ट्रवादीची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे…
-
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - धनगर समाजाला…
-
स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने निदर्शने
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. वर्धा/प्रतिनिधी - स्मार्ट प्रिपेड मिटरच्या…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई/ प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री श्री.…
-
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या…
-
खा. हेमंत पाटील यांच्या अटकेच्या मागणीसाठी मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय…
-
केडीएमसी रुग्णालयात गरोदर महिलेस दाखल करण्यास नकार, प्रवेशद्वारावरच प्रसूती ;स्मार्ट सिटीत आरोग्य यंत्रणा कधी होणार स्मार्ट ?
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - पुढारलेल्या महाराष्ट्रात…
-
कल्याण मध्ये नाना पटोले यांच्या विरोधात भाजपची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/p6VcYFNbPkE कल्याण- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…
-
अमरावतीच्या युवक काँग्रेसच्या वतीने रवी राणा यांच्या विरोधात निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - युवा स्वाभिमान…
-
कल्याण मध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजपची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विरोधी पक्षनेते…
-
युवासेनेकडून आमदार शिरसाठ यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे प्रतिनिधी - शिवसेना ठाकरे गटाच्या…
-
विनोदी साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - दिनांक 12 जून हा…
-
'प्रबुद्ध भारत' दिनदर्शिकेचे प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी…
-
महाराष्ट्रातील तीन पोलीसांना राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पोलीस सेवेत अदम्य…
-
खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटातील शिवसैनिकांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली / प्रतिनिधी - सध्या महाराष्ट्रात…
-
सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारार्थ ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भिवंडी (Bhiwandi) लोकसभा…
-
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या पत्रकरांसंदर्भातील व्यक्तव्यावर राष्ट्रवादीचे टिकास्त्र
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी…
-
पहलवान साहेब जीवन चरित्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सर्कसपटू मल्ल…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते किशोर दिवाळी अंकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन…
-
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यात वातावरण चांगलंच…
-
तृतीयपंथीयांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ओळखपत्राचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. नांदेड- जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे व…
-
शहीद जवान सुरज शेळके यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - शहीद जवान सुरज शेळके…