महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ताज्या घडामोडी महाराष्ट्र

गडचिरोलीत कोरोना पार्श्वभूमीवर मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

गडचिरोली/ प्रतिनिधी- पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा, बेड्सची नव्याने निर्मिती करण्यासह रेमडेसिवीर औषधांच्या पुरवठ्याबाबत तातडीने मंजुऱ्या मिळतील अशी ग्वाही दिली.जिल्ह्याच्या ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मंजूर व अतिरिक्त कोठ्यासाठी पालकमंत्री यांनी मुख्यमंत्री तसेच संबंधित सचिवांना दूरध्वनीद्वारे मागणी केली. यावेळी जिल्हयात तातडीने सदर मागणी पूर्ण केली जाईल असे ते यावेळी म्हणाले. गडचिरोली जिल्हयातील वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता त्यांनी आज आरोग्य विभागासह जिल्हयातील महत्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड वाढविणे आवश्यक असल्याचे सांगून यासाठी आवश्यक ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प तातडीने बसवून पूर्ण करा अशा सूचना दिल्या. यामध्ये येत्या आठवड्यात गडचिरोली सामान्य रूग्णालयातील 265 सिलेंडरचा ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प सुरू होत असून दुसरा 135 सिलेंडरचा ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प सुरू करत आहोत असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

पालकमंत्री यांनी यावेळी भविष्यातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेवून सिरोंचा, आरमोरी, चामोर्शी, कुरखेडा, वडसा, कोरची व एटापल्ली या ठिकाणी सुद्धा कमी क्षमतेचे ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प सुरू करणेबाबत निर्देश दिले.पालकमंत्री यांनी रूग्णांचे ऑक्सिजन वाचून मृत्यू रोखण्यासाठी तालुकास्तरावर ऑक्सिजन कॉन्संट्रेटर खरेदी करण्याच्या सूचना केल्या. सदर ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचे वाटप तालुका स्तरावरील कोरोना रूग्णालयात तातडीने केले जाणार आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन बेड्स वाढवणे आवश्यक असून त्याप्रमाणे सिरोंचा, वडसा अशा ठिकाणी तातडीने ती वाढवावीत असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री यांनी 200 रेमडेसिवीर इंजेक्शन्स आरोग्य विभागाकडे सुपूर्द केली. यावेळी ते म्हणाले की, कोरोना रूग्णांची जास्त औषधे घेण्याची इच्छा असते मात्र डॉक्टरांनी आवश्यक असलेल्यांनाच रेमडेसिवीर किंवा कोणतेही इतर उपचार द्यावेत. संपूर्ण देशासह राज्यात ऑक्सिजन म्हणा किंवा रेमडेसिवीर सारख्या औषधांचा तुटवडा आहे. उपलब्ध साठा गरजूंना मिळेल यासाठी आरोग्य विभागाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.नगरपालिकांच्या माध्यमातून कोविड नियंत्रणासाठी अनेक प्रकारची कामे होत असतात. शहरात कोविड रूग्ण संख्या मोठया प्रमाणात असते. यासाठी विविध तातडीच्या उपाययोजना राबविण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच पाच कोटी रूपये आकस्मिक निधी देण्याचे जाहीर केले.

गडचिरोली शहरातील सेवाभावी डॉक्टरांनी प्रशासनाकडे 100 बेडसाठी कोविड दवाखाना सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी आवश्यक निधी नगरपालिका प्रशासनाला उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन पालकमंत्री यांनी यावेळी दिले. दवाखान्यासाठी आवश्यक तरतुदींची तपासणी करून सदर 100 कोविड बेडच्या हॉस्पिटलला आरोग्य विभागाने मंजुरी प्रदान करावी अशा सूचना पालकमंत्री यांनी केल्या. सदर दवाखान्यासाठी नगरपरिषदेला दिलेला निधी हा संपूर्ण दवाखान्याच्या व्यवस्थापनासाठी खर्च करण्यात येणार आहे. हा निधी नगरविकास विभागाकडून देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×