प्रतिनिधी.
मुंबई – अनाथ बालकांचा अनाथालयात प्रवेश झाल्यानंतर त्यांना तातडीने अनाथ प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या अनाथ बालकांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी, असे निर्देश महिला व बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नुकतेच दिले. तसेच मागासवर्गीयांच्या धर्तीवर अनाथ तरुणांना बारावी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा प्रस्ताव तातडीने देण्याच्या सूचनाही श्री. कडू यांनी यावेळी दिल्या.
अनाथ बालकांच्या हक्कांसंदर्भात राज्यमंत्री श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी यासंदर्भातील विविध समस्यांचा आढावा घेऊन निर्देश दिले. यावेळी विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आ.राजकुमार पटेल हे उपस्थित होते.
राज्यातल्या अनाथांचा टक्का तो किती? पण संख्या कमी म्हणून त्यांना दुर्लक्षून चालणार नाही. आता अनाथ घेणारा नाही तो देणारा झाला पाहिजे म्हणूनच बालसंगोपन योजनेचे आणि संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान एखादे अनाथ मूल संस्थेत दाखल होताच त्याच्या नावावर दरमहा जमा करावे. या दोन्ही योजनेचे अनुदान दरमहा त्याचे नावे जमा केल्यास १८ व्या वर्षी त्याच्या हाती मोठी रक्कम येईल. म्हणजे काळजी आणि संरक्षणाच्या प्रक्रियेतून तो बाहेर पडला तर तो सक्षम आणि ‘सनाथ’ होईल, असे श्री.कडू यांनी यावेळी स्पष्ट केले.
आतापर्यंत किती अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र दिले त्याची माहिती सादर करावी. तसेच प्रमाणपत्र नाकारण्यात आलेल्यासंदर्भात सुनावणी घेण्यात यावी. अनाथालय अथवा अनाथ आश्रम संस्थेतून बाहेर पडलेल्या अनाथांची माहिती गोळा करण्याचे निर्देशही श्री. कडू यांनी यावेळी दिले. अनाथ बालके संस्थेत दाखल झाल्यानंतर एक वर्षाच्या आत त्यांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच यावर्षी दाखल झालेल्या व अद्याप प्रमाणपत्र न मिळालेल्यांसाठी येत्या १४ नोव्हेंबरपासून विशेष मोहिम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
श्री. कडू म्हणाले की, अनाथ बालकांची व्याख्या बदलण्याची गरज असून ज्या बालकांना कोणीही नातेवाईक नाही, अशा बालकांना संपूर्ण अनाथ समजून त्यांचा ‘अ’ गट करावा आणि ज्याचे पालक नाहीत, मात्र त्यांची जात माहित आहे, अशा बालकांना ‘ब’ गटात सामावून घेण्यासंदर्भात बदल करणे आवश्यक आहे. तसेच नोकऱ्यांमधील अनाथांसाठी असलेला आरक्षणाचा निकष हा एकूण रिक्त पदाच्या एक टक्केनुसार असावा, यासाठी पाठपुरावा करण्यात यावा.
सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांचा लाभ अनाथांना होण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. या योजनांमध्ये त्यांच्यासाठी एक टक्का आरक्षण ठेवण्याबाबत व अपंगांच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातील एक टक्का निधी अनाथांसाठी खर्च करण्यासंदर्भात संबंधित विभागाना सूचित करण्यात यावे. इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर संत गाडगेबाबा अनाथ घरकुल योजना राबविण्यात यावी. तसेच अनाथालयात असलेल्या बालकांना बालसंगोपन योजना व संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ मिळावा, यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस महिला व बालविकास, कामगार, शालेय व उच्च शिक्षण, सामाजिक न्याय, आरोग्य, नगरविकास, अन्न व नागरी पुरवठा विभाग, महसूल, परिवहन, ग्रामविकास, उद्योग व सामान्य प्रशासन विभागाचे संबंधीत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीस अनाथ प्रतिनिधी म्हणून नारायण इंगळे, अर्जुन चावला, सुलक्षणा आहेर, कमलाकर पवार आदी उपस्थित होते.
Related Posts
-
१४ ते ३० नोव्हेंबर दरम्यान अनाथ मुलांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम
प्रतिनिधी. मुंबई - शासकीय किंवा मान्यताप्राप्त स्वयंसेवी बालगृहातून बाहेर पडणाऱ्या…
-
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र…
-
आदिवासी बांधवांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र देण्याकरिता विशेष मोहीम
नाशिक/प्रतिनिधी - आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी समाजासाठी वैयक्तिक आणि सामूहिक…
-
राज्यात ३० मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम
मुंबई प्रतिनिधी- शैक्षणिक, सेवा, निवडणूक, इतर कारणांकरिता सन 2020-21 या…
-
१२ डिसेंबरपासून दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस…
-
अनाथ उमेदवारांना महिला व बालविकास विभागातील कंत्राटी पदांवर विशेष प्राधान्य
प्रतिनिधी. मुंबई - अनाथ उमेदवारांना राज्य शासनाने मोठा दिलासा देण्याचा निर्णय…
-
केडीएमसीची " विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०" लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली…
-
आता मतदार कार्ड होणार 'आधार' शी लिंक, १ ऑगस्टपासून विशेष मोहिम
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार…
-
बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक उमेदवारांना प्रमाणपत्र समर्पणाबाबत आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत…
-
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात…
-
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक…
-
आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त विशेष पोस्ट कार्ड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी - "आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, विशेष…
-
जागतिक जल दिनानिमित्त मंगळवारी विशेष प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जागतिक जलदिनानिमित्त महाराष्ट्र जलसंपत्ती…
-
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य…
-
तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय…
-
महाराष्ट्रातल्या दोन शोर्यवीर बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार
नेशन न्युज मराठी टीम महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्काराने…
-
केडीएमसी क्षेत्रात विशेष स्वच्छता सप्ताहाचा प्रारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महापालिकेच्या कायापालट अभियानात सामाजिक संस्था, नागरिकांनी सहभाग घेतल्यास…
-
टपाल कार्यालयांमधून राखी साठी विशेष लिफाफ्यांची विक्री
नेशन न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली - रक्षा बंधन हा…
-
क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आता ऑनलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंच्या…
-
मुंबईकरांना आता 'डिजीलॉकर' मध्ये मिळणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पेपरलेस कामकाजाकडे वेगाने वाटचाल…
-
मुंबईत फ्लेमिंगो’पक्ष्यांवर आधारित विशेष टपाल तिकिटाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त महाराष्ट्र मंडळाच्या…
-
आयआरसीटीसीतर्फे बाबासाहेब आंबेडकर विशेष यात्रा पॅकेज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘देखो अपना देश’…
-
माजी सैनिक पाल्यांच्या विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्जाबाबत आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- मुंबई जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/विधवा तसेच त्यांचे अवलंबित यांना…
-
बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर उद्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी – लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील…
-
भारतीय रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्यांच्या फेऱ्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लाखो भारतीय…
-
अम्मा अरियन चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - NFDC-नॅशनल फिल्म आर्काइव्ह्ज ऑफ…
-
प्रभात फेरीच्या माध्यमातून मतदान जनजागृती मोहिम
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणूक 2024 ची…
-
शाहीर पियुषी भोसले हिचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते विशेष सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा/प्रतिनिधी - शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात अण्णासाहेब…
-
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचे विशेष कॅम्प लावण्याची युवासेनेची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्य सरकारकडून राज्यातील कॉलेजेस पुन्हा सुरू करण्याचा…
-
सभेच्या मैदानावरून राणा दाम्पत्य व बच्चू कडू आमने-सामने
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावतीत प्रहार जनशक्ती…
-
राज्यस्तरीय वामनदादा कर्डक महिला विशेष काव्यवाचन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- महाकवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष…
-
लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी सेवेचा समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक,…
-
भरड धान्याबाबत जनजागृतीसाठी इंडिया टुरिझमचा विशेष उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने …
-
नो मास्क- नो एन्ट्री मोहिम प्रभावीपणे राबवा- जिल्हाधिकारी
प्रतिनिधी. ठाणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर ही…
-
केडीएमसी क्षेत्रात बालकांसाठी विशेष गोवर रुबेला लसीकरण अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील काही भागात…
-
मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देवू नये मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - जालन्यात मराठा…
-
सिंचन वाढविण्यासाठी जिल्ह्यातील नद्यांचे खोलीकरण व्हावे - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती -जिल्ह्यातील चंद्रभागा, सापन, चारघड, पूर्णा, बिच्छन अशा विविध नद्यांच्या…
-
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न
मुंबई/प्रतिनिधी - कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला क्रीडाप्रकार आहे. या कबड्डी…
-
२५ जुलै पासून कॉम्प्युटर टायपिंग ऑनलाईन प्रमाणपत्र परीक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,…
-
महाराष्ट्र टपाल विभागाकडून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष लिफाफा जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिन…
-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अनुसूचित जातीतील इयत्ता 10 वी च्या परीक्षेत…
-
केडीएमसी शिक्षण विभागाच्यावतीने दिव्यांग बालकांना साहित्य वाटप
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
२० ते २१ तारखेपर्येंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल - आमदार बच्चू कडू
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - काल सत्ता संघर्षाचा निकाल…
-
महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या,…
-
जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रासोबत…
-
महिला विकासाच्या योजनांसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष
मुंबई - महिलांच्या विकासाला बळ देण्याची आवश्यकता असून महिला विकासाच्या योजना…
-
शेतक-यांना कंपन्यांनी तातडीने नुकसानभरपाई द्यावी - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
प्रतिनिधी. सदोष बियाण्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतक-यांना संबंधित बीज…
-
विशेष लोक अदालतीत मोटार अपघाताची १३०प्रलंबित प्रकरणे निकाली
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्ह्यातील प्रलंबित मोटार अपघात…