प्रतिनिधी.
मुंबई – आज सकाळी मुख्यमंत्री कार्यालय, MMRDA, MMRCL च्या अधिकाऱ्यांसोबत मेट्रो कारशेड साठी MMRDA च्या ताब्यात दिलेल्या कांजूरमार्ग येथील जमिनीला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्याच बरोबर अधिकारी वर्गाशी चर्चा केली. मेट्रो लाईन-३ व ६ कार डेपो याठिकाणी बनवून सुधारित योजनेसह कनेक्टिव्हिटी वाढविण्यात येईल. मातीचे परीक्षण याआधीच सुरू झाले आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मेट्रो कारशेड साठी कांजूरमार्ग येथील जागा शुन्य रुपये खर्च करून कारशेडसाठी घेण्यात आली आहे, शासनाचा एकही पैसा ही जमीन खरेदी करण्यासाठी खर्च झालेला नाही असे हि मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे.