नेशन न्यूज मराठी टीम.
लातूर/प्रतिनिधी – अमरावतीच्या सभेत महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल लातूरमध्ये एमआयएमच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद अली शेख यांनी भिडे हे आतंकवादी मानसिकतेचा माणूस असल्याचे सांगितले. तसेच भिडे हे देशाच्या तिरंग्याला मानत नाहीत, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस मानत नाहीत आणि संभाजी भिडेंनी इस्लाम धर्माबद्दल इस्लाम हा भारताचा खरा शत्रू आहे, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या देशद्रोही मानसिकतेच्या माणसावर वेळीच कारवाई केली नाही तर हा माणूस देशाच्या शांततेसाठी धोका निर्माण करु शकतो. अशा मनोरुग्णाला अटक करण्याची मागणी शेख यांनी केली. तसेच भिडेंना सरकार छुपी मदत करत असल्याचा आरोप यावेळी एमआयएमचे लातूर जिल्हाध्यक्ष अली यांनी केले.