कल्याण – कल्याण जवळच्या अटाळी गावात मायलेकाच्या अंगात भूत शिरल्याचे मांत्रिकाने सागितल्यामुळे स्वतःच्या घरच्या माणसानीच माय लेकाला बेदम मारहाण करत त्यांची हत्या केल्याचा आघोरी प्रकार घडला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीसानी मारहाण करणाऱ्या मयताच्या अल्पवयीन मुलासह पुतण्या व पुतणी व मांत्रिका विरोधात गुन्हा दाखल करत त्याना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कल्यांण पश्चिमेतील शहरी भागातील अटाळी गावात शनिवारी कल्की जयंतीच्या मुहूर्त बघून मांत्रिकाच्या बोलण्यावरून नरबळी प्रकार घडून आणला आहे , मांत्रिक सुरेंद्र पाटील ( ३५) यांनी कुमारी कविता कैलास तरे यांच्या अंगात देवी येत होती आणि मयत मायलेक १) पंढरीनाथ शिवराम तरे(५०)(,२)चंदूबाई शिवराम तरे (७६) यांच्या अंगात भूत असून ते काढण्यासाठी आरोपी कविता तरे आणि मृतांचा अल्पवयीन मुलगा (१७) यांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली मृतांच्या अंगाला हळद आणि अंगातून रक्ताचा सडा यांची पूजा करण्यात आली आणि देवीला नरबळी हवं असल्याचे मांत्रिक सुरेंद्र पाटील यांनी दोघांना मारण्यास सांगितले शनिवारी दुपारी केलेला विधी रात्र होत असेपर्यंत करण्यात आला त्यात मायलेक मृत्यमुखी पडले .त्यानंतर फिर्यादी देवेंद्र तुलसीदास भोईर(३८) यांनी चौघा विरोधात खडक पाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३४ आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या २०१३ अंतर्गत कलम ३ अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आले आहे.चौघा आरोपींना पोलिसांनी अटक करून कल्याण सत्र न्यायालयात हजर केले आहे .