नागपूर/प्रतिनिधी – नागपूर हे देशात रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीमुळे जोडले असल्यामुळे हे शहर लॉजिस्टिकची राजधानी बनण्याची पूर्ण क्षमता ठेवते. लगतच्या वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे ड्रायपोर्ट अंतर्गत मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या निर्मितीमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या प्रकल्पाच्या माध्यमातून कंटेनरनिर्मितीसह लॉजिस्टिक व्यवसाय वृध्दींगत होवून मालवाहतुकीवरचा खर्च कमी होणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले.
हॉटेल सेंटर पॉईंट येथे जेएनपीटी व राष्ट्रीय महामार्ग रसद व्यवस्थापन यांच्यात यासंबंधी सामंजस्य करार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री तथा वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, खासदार रामदास तडस, वर्धा जि.प. अध्यक्षा सरिता गाखरे, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, एनएचएलएमएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गौड, संचालक के. सत्यनाथन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या लॉजिस्टिक विभागाचे संयुक्त सचिव सुमन प्रसाद सिंग, मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रिचा खरे आदी यावेळी उपस्थित होते.
सिंधी येथील मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या माध्यमातून निर्यातीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. देशातील 35 मल्टी मॉडेल पार्कपैकी नागपूर हे महत्वपूर्ण असून येथे स्थापन होणाऱ्या विविध उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत यंत्रणा उभारण्यात आली असून त्यासोबत जेएनपीटी काम करणार आहे. त्यामुळे येथून देशभरात निर्यातीवर होणारा वाहतूक खर्च कमी होईल, असा विश्वास श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.
रेल्वे, समृद्धी महामार्ग आणि नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग या मल्टी मॉडेल पार्कला जोडला आहे. तसेच शीतगृह कंटेनरची याठिकाणी व्यवस्था असल्यामुळे निर्यातयोग्य शेतमाल व फळांची नासाडी होणार नाही. परिणामी वाहतूक खर्चात बचत होईल. विदर्भातील उद्योग व्यापार संघटना, लघु उद्योग असो.,चेंबर ऑफ कॉमर्स, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन या सर्व उद्योग संघटनांनी यावर परिसंवाद घ्यावा. येथे राज्य शासनाने औद्योगिक क्षेत्र स्थापन करावे, असे सांगून महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक महामंडळ- सीकॉम यांच्या माध्यमातून सिंधीला स्मार्ट बनवून स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य देण्याबात नियोजन करावे. पूर्व विदर्भात मत्स्यशेतीला वाव असल्यामुळे निर्यातीच्या संधी उपलब्ध होतील. त्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घ्यावा. विदर्भात संत्रा उत्पादकांनाही याचा फायदा होईल, असे मंत्री गडकरी म्हणाले.
या मल्टी मोडल लॉजिस्टीक पार्कच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. वर्धा जिल्ह्यासाठी हा प्रकल्प महत्वाकांक्षी असून त्याच्या पूर्णत्वासाठी राज्य शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याची ग्वाही श्री. केदार यांनी दिली. हा प्रकल्प उभारण्यासाठी सिंधी येथील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांना प्राधान्याने रोजगार देण्यात यावा. या ठिकाणी कंटेनर निर्मिती, वाहतूक व्यवस्थापन व त्यानुषंगाने उद्योग-व्यवसायांना चालना मिळणार असून जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असल्याचे मंत्री केदार यांनी यावेळी सांगितले.
सिंधी येथील ड्रायपोर्टमुळे वाहतूक खर्चात कपात होईल आणि याचा फायदा येथे स्थानिक शेतकऱ्यांना होईल, असे खासदार तडस यांनी सांगितले.जेएनपीटीचे अध्यक्ष सेठी, संचालक के. सत्यनाथन, संयुक्त सचिव सुमन प्रसाद सिंग यांनी प्रकल्पासंबंधी आणि होणाऱ्या खर्चाबाबत यावेळी माहिती दिली.
Related Posts
-
‘महाप्रित’ आणि पुणे नॉलेज क्लस्टर यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करार
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष पूर्ण…
-
बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदासोबत इरेडाचा सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम.नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील अक्षय ऊर्जा वाढीला…
-
भारतीय नौदल आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरू यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - देशांतर्गत…
-
राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात सामंजस्य करार
मुंबई/प्रतिनिधी - इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER)…
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
सीएसआयआर-एनआयओ आणि बिट्स पिलानी यांच्यात शैक्षणिक करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी/प्रतिनिधी - सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था…
-
जालना मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी सामंजस्य करार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - मराठवाड्याच्या उद्योग क्षेत्राला पायाभूत चालना देणाऱ्या जालना…
-
भारताचे राष्ट्रीय संग्रहालय आणि डेन्मार्कचे कोल्डिंग संग्रहालय यांच्यामध्ये सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - डेन्मार्क येथील कोल्डिंग…
-
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान नागरी विमान वाहतूक सहकार्यासाठी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारत…
-
चित्त्यांचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आशियाई देशांमध्ये पुन्हा…
-
एनटीपीसी आणि ऑइल इंडिया यांच्यात अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतातील…
-
कोकणात होणार ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक,जेएसडब्ल्यू सोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - जेएसडब्ल्यू आणि महाराष्ट्र शासनाच्या…
-
परिसंस्था, पर्यावरण आणि विकास यांच्यात समतोल राखायला हवा- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - परिसंस्था, पर्यावरण आणि विकास…
-
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्योगक्षेत्राशी संबंधित मजबूत भागिदारी अस्तित्वात येणार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - वाणिज्य सचिव…
-
तांत्रिक सहकार्यासाठी हिंदुस्तान कॉपर लिमिटेडचा आयआयटी धनबादसोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोलकाता येथील एचसीएल…
-
भारत आणि सौदी अरेबियाने वीज आंतरजोडणी, हरित/स्वच्छ हायड्रोजन साठी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि सौदी…
-
कॅनडामधील कॅनपोटेक्स पोटॅशियमच्या सर्वात मोठ्या पुरवठादाराबरोबर भारतीय खत कंपन्यांचा सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोरोमंडल इंटरनॅशनल, चंबल…
-
अर्थपुरवठ्याच्या उद्देशाने इरेडाचा बँक ऑफ महाराष्ट्र सोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - नूतन…
-
देशी बनावटीच्या “लंपी प्रोव्हॅक” लसीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - ‘गोटपॉक्स’ आणि ‘लंपी प्रोव्हॅक’…
-
गेल इंडिया, वितारा एनर्जीचा राज्य शासनासोबत सामंजस्य करार, राज्यात १६ हजार ५०० कोटींची करणार गुंतवणूक
मुंबई/प्रतिनिधी - नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध गेल इंडिया तसेच…
-
पत्रकार आणि वैज्ञानिकांना एकत्र आणणारी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची माध्यम आणि संवादक परिषद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - फरिदाबादच्या टीएचएसटीआय…
-
भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य करारावरील वाटाघाटींची पुन्हा सुरुवात
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि…
-
सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या…
-
खादी आणि ग्रामोद्योग आयोगात पद भरती
पदाचे नाव : संचालक (एकुण पदे १८) शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा…
-
भारतीय सिनेमा आणि भारताची सौम्यशक्ती या विषयावर ३ आणि ४ मे रोजी चर्चासत्र
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आयसीसीआर म्हणजेच सांस्कृतिक संबंधविषयक…
-
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाचा खासगी नोकरीविषयक पोर्टल्स, कंपन्या आणि कौशल्य प्रदाते यांच्याशी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय…
-
कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल…
-
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगामार्फत…
-
ऑनलाइन पोर्टल मुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांना रोख पुरस्कार आणि अन्य लाभ सुलभरीत्या मिळण्यात होणार मदत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - डिजिटल इंडियाच्या माध्यमातून …
-
देशातील कर्करोग विषयक संशोधन आणि उपचाराला चालना
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारत सरकार देशातील…
-
मुंबई आणि राजस्थानात इन्कमटॅक्स विभागाच्या धाडी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - इन्कमटॅक्स विभागाने 16.06.2022…
-
भारतीय नौदलाचा तोफा आणि क्षेपणास्त्र परिचालन परिसंवाद संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या…
-
तापी आणि पूर्णा नदीच्या पुरामुळे पिकांचे नुकसान
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - तापी व…
-
नांदेड मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसैनिकांचा जल्लोष
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
१४ आणि १५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन मुंबईत
प्रतिनिधी. मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५…
-
रोग निदान आणि उपचारासाठी नवपद्धती ‘जिमोनिक्स, झेब्राफिश
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - रोग निदान व उपचारासाठी जिनोमिक्स,…
-
मुंबईत एनएफडीसी आणि अर्जेंटिना चित्रपट महोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.मुंबई/प्रतिनिधी - भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास…
-
डोंबिवलीत काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आले आमने सामने
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
-
भारतीय केळी आणि बेबीकॉर्न कॅनडाच्या बाजारपेठेत विक्रीला जाणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतात उत्पादित केळी आणि…
-
यवतमाळ अगरबत्ती आणि लाखेपासून बांगड्या बनविण्याचे नियोजन
प्रतिनिधी . यवतमाळ, दि. २३ - पुजा करतांना देवासमोर लावण्यात…
-
भारतीय नौदल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही यांच्यात सागरी युद्ध सराव
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- भारतीय नौदल आणि रॉयल…
-
दुबईत‘प्रसारमाध्यम आणि मनोरंजन सप्ताहाचे’ उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - माहिती आणि प्रसारण…
-
भारत आणि मलेशियाचा संयुक्त लष्करी सराव सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय आणि मलेशियाच्या…
-
जनता उपाशी आणि नेते मात्र तुपाशी - काकासाहेब कुलकर्णी
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर…
-
ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे पंतप्रधान यांच्या हस्ते लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - ठाणे आणि दिवा दरम्यानच्या…
-
आरपीएफमध्ये कॉन्स्टेबल आणि एएसआयच्या ९५०० पदांसाठी भर्तीचे वृत्त बनावट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आरपीएफ म्हणजेच रेल्वे…
-
सोलापुरात शहर आणि जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी
सोलापूर/प्रतिनिधी- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात विकेंड…