प्रतिनिधी.
मुंबई – राज्यात एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष पूर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. १५ कंपन्यांमार्फत जवळपास ₹३४,८५० कोटींची गुंतवणूक राज्यात होत आहे. तसेच यामुळे सुमारे २३,१८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, एफडीआय शेरपा प्रधान सचिव भूषण गगराणी उद्योग प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अनबलगन आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, गुंतवणूकदार आणि राज्य शासन यांचा एकमेकांवर विश्वास आहे. मागील सामंजस्य करारातील अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. सुमारे 60 टक्के उद्योगांच्या बाबतीत जमीन अधिग्रहणासारख्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत ही निश्चितच समाधानाची बाब आहे.कोरोनासारख्या संकट काळातही उद्योग विभागाने उद्योजकांचा विश्वास कायम ठेवला आहे. यासाठी उद्योग खात्याचा अभिमान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आज झालेले सामंजस्य करार ही केवळ सुरूवात आहे. सुमारे 35 हजार कोटींची गुंतवणूक आज होते आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. लवकरच एक लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्र या कोरोना परिस्थितीत नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेईल.युनिटी इन डायव्हर्सिटी असे हे आजचे करार आहेत. केमिकल, डेटा यासह लॉजिस्टिक, मॅनुफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीतही देशाचे महत्त्वाचे केंद्र बनेल, असा मला विश्वास आहे.
यु के, स्पेन, जपान, सिंगापूर यासारख्या देशांतील जागतिक उद्योजकांनी आज सामंजस्य करार केले असून आजही राज्यास गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले जात असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.श्री. देसाई म्हणाले, डेटा सेंटर, लॉजिस्टिक पार्क, मॅनुफॅक्चर या सर्व क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आवश्यक असणारे वातावरण राज्यात उपलब्ध आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य गुंतवणुकीचे लक्ष सहज साध्य करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आज झालेले सामंजस्य करार म्हणजे आमची धोरणे, कौशल्य, पायाभूत सुविधांमध्ये सातत्यपूर्ण सुधारणांची आमची वचनबद्धता आणि या सगळ्यापलीकडे जागतिक स्तरावरील व्यावसायिकांशी असलेले आमचे संबंध यांचे चांगले फळ आहे. भविष्यातही महाराष्ट्र राज्यात अनेक नवीन गुंतवणूकदारांचे स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळेल असा विश्वास उद्योग राज्यमंत्री कु. अदिती तटकरे यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करताना व्यक्त केला
सामंजस्य करार स्वाक्षरी सोहळा कंपन्यांची संक्षिप्त माहिती
अ.क्र | नाव | देश | क्षेत्र | प्रस्तावितगुंतवणूक(रु. कोटीमध्ये) | प्रस्तावितरोजगार |
1 | मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि. | जपान | इलेक्ट्रॉनिक्स | 490 | 350 |
2 | ब्राईट सिनो होल्डिंग प्रा. लि. | भारत | इंधन तेल व वायू | १,८०० | १,५७५ |
3 | ओरिएंटल ऍरोमॅटिक्स | भारत | रसायने | 265 | 350 |
4 | मालपानी वेअरहाऊसिंग अँड इंडस्ट्रिअल पार्क | भारत | लॉजिस्टिक्स | 950 | ८,००० |
5 | एव्हरमिंट लॉजिस्टिक्स | भारत | लॉजिस्टिक्स | 354 | २,१०० |
6 | पारिबा लॉजिस्टिक्स पार्क | भारत | लॉजिस्टिक्स | 381 | २,२०० |
7 | ईश्वर लॉजिस्टिक्स पार्क | भारत | लॉजिस्टिक्स | 395 | २,२०० |
8 | नेट मॅजिक आयटी सर्व्हिसेस प्रा. लि. | भारत | डेटा सेंटर | १०,५५५ | 575 |
9 | अदानी एन्टरप्राइजेस लि. | भारत | डेटा सेंटर | ५,००० | १,००० |
10 | मंत्र डेटा सेंटर | स्पेन | डेटा सेंटर | १,१२५ | 80 |
11 | एसटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स इंडिया प्रा. लि. | भारत | डेटा सेंटर | 825 | 800 |
12 | कोल्ट (डेटा सेंटर होल्डिंग्स इंडिया एलएलपी) | युके | डेटा सेंटर | ४,४०० | 100 |
13 | प्रिन्स्टन डिजिटल ग्रुप | सिंगापुर | डेटा सेंटर | १,५०० | 300 |
14 | नेस्क्ट्रा | भारत | डेटा सेंटर | २,५०० | २,००० |
15 | इएसआर इंडिया | सिंगापुर | लॉजिस्टिक्स | ४,३१० | १,५५२ |
एकूण | ३४,८५० | २३,१८२ |
Related Posts
-
‘महाप्रित’ आणि पुणे नॉलेज क्लस्टर यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
एनएचएआय आणि जेएनपीटी यांच्यात सामंजस्य करार
नागपूर/प्रतिनिधी - नागपूर हे देशात रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीमुळे जोडले…
-
बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदासोबत इरेडाचा सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम.नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील अक्षय ऊर्जा वाढीला…
-
भारतीय नौदल आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरू यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - देशांतर्गत…
-
राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात सामंजस्य करार
मुंबई/प्रतिनिधी - इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER)…
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
सीएसआयआर-एनआयओ आणि बिट्स पिलानी यांच्यात शैक्षणिक करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी/प्रतिनिधी - सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था…
-
जालना मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी सामंजस्य करार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - मराठवाड्याच्या उद्योग क्षेत्राला पायाभूत चालना देणाऱ्या जालना…
-
भारताचे राष्ट्रीय संग्रहालय आणि डेन्मार्कचे कोल्डिंग संग्रहालय यांच्यामध्ये सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - डेन्मार्क येथील कोल्डिंग…
-
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान नागरी विमान वाहतूक सहकार्यासाठी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारत…
-
चित्त्यांचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आशियाई देशांमध्ये पुन्हा…
-
एनटीपीसी आणि ऑइल इंडिया यांच्यात अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतातील…
-
कोकणात होणार ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक,जेएसडब्ल्यू सोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - जेएसडब्ल्यू आणि महाराष्ट्र शासनाच्या…
-
विविध अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांसाठी 'महाज्योती'चे आर्थिक पाठबळ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विविध अभ्यासक्रम तसेच स्पर्धा परीक्षेतील…
-
तांत्रिक सहकार्यासाठी हिंदुस्तान कॉपर लिमिटेडचा आयआयटी धनबादसोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोलकाता येथील एचसीएल…
-
कॅनडामधील कॅनपोटेक्स पोटॅशियमच्या सर्वात मोठ्या पुरवठादाराबरोबर भारतीय खत कंपन्यांचा सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोरोमंडल इंटरनॅशनल, चंबल…
-
भारत आणि सौदी अरेबियाने वीज आंतरजोडणी, हरित/स्वच्छ हायड्रोजन साठी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि सौदी…
-
अर्थपुरवठ्याच्या उद्देशाने इरेडाचा बँक ऑफ महाराष्ट्र सोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - नूतन…
-
मनसे आ.राजू पाटील यांनी घेतली एमआयडीसी,केडीएमसी आणि पिडब्लूडीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक
प्रतिनिधी. डोंबिवली - गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना डोंबिवली…
-
देशी बनावटीच्या “लंपी प्रोव्हॅक” लसीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - ‘गोटपॉक्स’ आणि ‘लंपी प्रोव्हॅक’…
-
गेल इंडिया, वितारा एनर्जीचा राज्य शासनासोबत सामंजस्य करार, राज्यात १६ हजार ५०० कोटींची करणार गुंतवणूक
मुंबई/प्रतिनिधी - नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध गेल इंडिया तसेच…
-
पत्रकार आणि वैज्ञानिकांना एकत्र आणणारी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची माध्यम आणि संवादक परिषद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - फरिदाबादच्या टीएचएसटीआय…
-
विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अपुऱ्या पावसाने…
-
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ‘रुमणे मोर्चा’
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - वैजापुर येथे…
-
भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य करारावरील वाटाघाटींची पुन्हा सुरुवात
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि…
-
विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचे आंदोलन
DESK MARATHI NEWS ONLINE. संभाजीनगर / प्रतिनिधी - एकीकडे मराठवाडा…
-
सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या…
-
खादी आणि ग्रामोद्योग आयोगात पद भरती
पदाचे नाव : संचालक (एकुण पदे १८) शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा…
-
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
DESK MARATHI NEWS ONLINE. नाशिक / प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या काही…
-
विविध मागण्यांसाठी हजारो आशा स्वयंसेविका रस्त्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा,…
-
भारतीय सिनेमा आणि भारताची सौम्यशक्ती या विषयावर ३ आणि ४ मे रोजी चर्चासत्र
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आयसीसीआर म्हणजेच सांस्कृतिक संबंधविषयक…
-
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरतीTeam DGIPR द्वारापदाचे नाव – जतन…
-
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाचा खासगी नोकरीविषयक पोर्टल्स, कंपन्या आणि कौशल्य प्रदाते यांच्याशी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय…
-
कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल…
-
ग्राम रोजगार सेवकांचा विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा/प्रतिनिधी - वर्ध्यात ग्रामरोजगार सेवकांच्या वतीने…
-
रिपब्लिकन सेनेचा विविध मागण्यांसाठी केडीएमसीवर धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - विविध मागण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या…
-
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगामार्फत…
-
ऑनलाइन पोर्टल मुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांना रोख पुरस्कार आणि अन्य लाभ सुलभरीत्या मिळण्यात होणार मदत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - डिजिटल इंडियाच्या माध्यमातून …
-
एमपीएससीच्या विविध संवर्गातील पदभरतीस शासनाची मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - सन 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील…
- डोंबिवली एमआयडीसी मधील रासायनिक कंपनीला आग
डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील ड्रीमलॅंड डाईंग नामक…
-
भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये विविध ३६८ पदांची भरती
मॅनेजर (फायर सर्व्हिसेस) - ११ जागा मॅनेजर (टेक्निकल) - २…
-
‘सीसीआय’मध्ये विविध ९५ पदांसाठी भरती
पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) एकूण जागा - ५ वयोमर्यादा – दि.…
-
देशातील कर्करोग विषयक संशोधन आणि उपचाराला चालना
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारत सरकार देशातील…
-
रोजगार सेवकांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - शासनामार्फत अनेक…
-
मुंबई आणि राजस्थानात इन्कमटॅक्स विभागाच्या धाडी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - इन्कमटॅक्स विभागाने 16.06.2022…