नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – अमरावती जिल्ह्यातील मेळघाट अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, येथील महिलांना राखीच्या माध्यमातून रोजगार मिळाला. मेळघाटच्या धारणी तालुक्यातील लवादा येथे 2011 वर्षापासून पर्यावरण पूरक राख्या बनवण्याचे काम सुरू आहे.
महिला आपल्या विविध प्रकारच्या कलेतून पर्यावरण पूरक राख्या बांबूपासून राख्यांवर कोरीव काम केलं जात आहे. कच्च्या मालाच्या आधारावर 32 पेक्षा जास्त डिझाईनच्या राखी येथे विकसित केल्या जातात. यावर्षी 150 पेक्षा जास्त बचत गटातील महिलांनी राखी बनवण्याचं काम हाती घेतल आहे. 180 पेक्षा जास्त कारागीर विविध गृह उपयोगी वस्तू बनवत आहेत.
मेळघाटच्या महिलांना गेल्या काळात पंतप्रधान मोदींना राखी बांधण्याची संधी मिळाली होती. यावर्षी देखील देशासह विविध देशांमध्ये देखील मेळघाटच्या राख्या पाठवल्या जाणार आहेत. कौशल्य विकासाच्या दृष्टीने राखीची किंमत 15 रुपये ठेवण्यात आली आहे.