नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कार्यालयीन कामकाजात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी तसेच नागरिकांच्या तक्रारी, निवेदने यांचा निपटारा करणेकामी आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत उपआयुक्त (परिमंडळ १ व २) यांनी त्यांच्या अधिपत्याखालील मध्यवर्ती प्रभागक्षेत्र कार्यालयात “जनता दरबार” आयोजित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी यापूर्वीच दिले आहेत.
तथापि उपआयुक्त (परिमंडळ १ व २) यांच्या स्तरावर तक्रार देऊनही सदर तक्रारींचे/समस्यांचे निराकरण न झाल्यास अशा नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांचे दालनात दर शुक्रवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत बैठकीचे आयोजन करण्याबाबतचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहेत.
यासाठी नागरीकांनी अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात भेटीच्या दिनांकापूर्वी ८ दिवस अगोदर, समस्यांबाबत निवेदन व निवेदनासोबत उपआयुक्त (परिमंडळ १ व २) यांचे स्तरावर केलेल्या तक्रारीच्या छायांकीत प्रती जोडणे आवश्यक आहे. परिमंडळ उपआयुक्तांकडे अर्ज दाखल न करता थेट अतिरिक्त आयुक्तांकडे केलेले नागरीकांचे अर्ज विचारात घेतले जाणार नसल्याचेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.