Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
देश महत्वाच्या बातम्या

नवी दिल्लीत सागरी सीमेवरील बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी बैठक

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारताच्या सागरी सीमेवर बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात आहे. परदेशातून येणाऱ्या अमली पदार्थ, शस्त्र, रक्त हिरे तसेच सोने, इ तस्करी केली जात आहे. सागरी सीमेवर होणाऱ्या बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी तसेच क्षेत्रीय सहकार्याला चालना देण्यासाठी भारतीय तटरक्षक दल आणि रॉयल ओमान पोलीस तटरक्षक दल यांच्या अधिकाऱ्यांची नवी दिल्ली येथे बैठक झाली. सागरी सीमेवर होणाऱ्या बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी तसेच क्षेत्रीय सहकार्याला चालना देण्यासाठीच्या सहयोगात्मक प्रयत्नांमध्ये महत्त्वाचा टप्पा गाठत नवी दिल्ली येथे भारतीय तटरक्षक दल (आयसीजी)आणि रॉयल ओमान पोलीस तटरक्षक दल (आरओपीसीजी) यांच्या अधिकाऱ्यांची पाचवी वार्षिक उच्चस्तरीय बैठक पार पडली. आयसीजीचे महासंचालक राकेश पाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सहभागी झालेल्या आरओपीसीजीच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ओमानचे सहाय्यक अधिकारी कमांडिंग कर्नल अब्दुल अझीझ मोहम्मद अली अल जाबरी यांनी केले.

क्षमता उभारणी कार्यक्रम, परस्परांच्या जहाजांच्या भेटी, सी रायडर कार्यक्रमाची अंमलबजावणी, प्रदूषण नोंद करणाऱ्या केंद्रांच्या दरम्यान व्यावसायिक बंध स्थापित करणे या आणि इतर सहयोगात्मक व्यवस्थांच्या माध्यमातून द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यावर या बैठकीत अधिक भर देण्यात आला. सागरी आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी परस्पर सहकार्यात वाढ करण्यातून या प्रदेशातील सागरी सुरक्षा आणि सुरक्षितताविषयक आराखडा सशक्त करण्याबाबत दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी कटिबद्धता व्यक्त केली. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाअंतर्गत भारताच्या जहाजबांधणी क्षमतेचे दर्शन घडवण्याच्या दृष्टीने 25 एप्रिल 2024 रोजी भारतीय संरक्षण क्षेत्रातील उत्पादक संघ आणि आरओपीसीजीचे प्रतिनिधी यांच्यात बैठक होणार आहे.

Translate »
X