प्रतिनिधी.
अलिबाग– आधी करोनाचे संकट, त्यानंतरचे निसर्ग चक्रीवादळाचे संकट यामुळे जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला बळ देण्यासाठी शासन, प्रशासन प्रयत्नशील तर आहेच. मात्र इन्श्युरन्स कंपन्या आणि पोल्ट्रीधारकांनी सामंजस्य वृध्दींगत करुन एकमेकांमधील विश्वासार्हता टिकवावी तसेच जिल्हा प्रशासन व राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्तिक प्रयत्नातून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास निश्चित साधला जाईल, असा विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी आज येथे व्यक्त केला.
जिल्ह्यातील पोल्ट्रीधारकांच्या अडीअडचणीविषयी उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृह येथे इन्श्युरन्स कंपन्यांचे अधिकारी, पोल्ट्रीधारक शेतकरी असोसिएशनचे पदाधिकारी, पोल्ट्रीधारक शेतकरी यांची बैठक खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, कृषी व पशुसवंर्धन सभापती बबन मनवे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बंकट आर्ले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड , जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके, विभागीय व्यवस्थापक शांता विश्वास, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आनंद निंबेकर हे उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस खासदार सुनिल तटकरे यांनी उपस्थित पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांकडून त्यांच्या अडीअडचणी, प्रश्न समजून घेतले व त्यानंतर ते म्हणाले की, मागील काही महिन्यांपासून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील छोटे-मोठे पोल्ट्रीधारक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधींनी, कुक्कुटपक्षी विकत घेणाऱ्या कपंन्यांनी, विमा कंपन्यांनी पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ उद्दिष्टपूर्तीकरिता काम न करता लहान लहान पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करुन बळ द्यायला हवे.
या कामाकरिता जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण पातळीपर्यंत समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करावेत. छोट्या पोल्ट्रीधारकांनाही आवश्यक ते विमा संरक्षण मिळणे गरजेचे आहे, यासाठी आवश्यक ती कार्यवाही विमा कंपन्यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून करावी.कुक्कुटपक्षी विकत घेणाऱ्या कपंन्यांचे प्रतिनिधी ,विमा कंपन्यांचे प्रतिनिधी व पोल्ट्रीधारक शेतकरी यांच्यात परस्पर संमतीने जो काही व्यावसायिक करार होतो, त्या कराराची प्रत संबंधित शेतकरी तसेच कंपनी असे दोघांकडेही असणे आवश्यक आहे. जसे शेतीमालाला किमान आधारभूत किंमत दिली जाते त्याच धर्तीवर पोल्ट्रीव्यावसायिकांनाही त्यांच्या कुक्कुटपक्षांसाठी किमान आधारभूत किंमत दिली जावी, त्यादृष्टीने योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक व्यावसायिकांचे फेडरेशन तयार करुन त्याला सहकाराची जोड देऊन पोल्ट्रीव्यवसाय देखील नियोजित पध्दतीने चालावा यासाठी योग्य ते प्रयत्न केले जावेत, असे सांगून खासदार सुनिल तटकरे यांनी मा.पंतप्रधानांनी शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, पोल्ट्रीधारकांना मिळेल याची मोहीम जिल्हा प्रशासनाने राबवावी, असे उपस्थित अधिकाऱ्यांना सूचित केले.या बैठकीस विविध राष्ट्रीयकृत बँका, विमा कंपन्या, कुक्कुटपक्षी विकत घेणाऱ्या कपंन्यांच्या प्रतिनिधींची, पोल्ट्रीव्यवसाय करणारे शेतकरी यांची उपस्थिती होती.
Related Posts
-
वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांवर उर्ज्यामंत्री यांच्या उपस्थितीत बैठक
प्रतिनिधी. मुंबई - वीज कामगारांच्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ते त्वरित…
-
कल्याण डोंबिवलीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक संपन्न
कल्याण/ प्रतिनिधी - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात कोणतीही दुर्घटना होवू नये…
-
दैवत विश्रामगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
प्रतिनिधी.अलिबाग - स्थानिक लोकाधिकार समितीने विविध उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ…
-
आजादी का अमृत महोत्सव’ कोअर समितीची बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे…
-
सन २०२२-२३ ची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - – जिल्ह्यातील शेती उत्पादन…
-
कोकण भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी. नवी मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्या…
-
हाफकीन मधील संसर्गजन्य रोग संशोधन केंद्र निर्मितीसाठी बैठक
मुंबई प्रतिनिधी - येथील हाफकीन इन्स्टिट्युटमध्ये संसर्गजन्य रोगाचे संशोधन केंद्र…
-
गुंतवणुकीसंदर्भातील भारत-संयुक्त अरब अमिराती उच्चस्तरीय संयुक्त कृतीदलाची ११ वी बैठक
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- गुंतवणुकीवरील भारत-संयुक्त अरब अमिराती …
-
तेजश्री' इमारतीत जनमित्राच्या पुतळयाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रातिनिधी - वीज वितरण व्यवस्थेतील…
-
महास्वयंम् वेबपोर्टसंदर्भातील अडचणी, तक्रारींसाठी हेल्पलाईन सेवेचे लाभ घेण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - कौशल्य,रोजगार, उद्दोजकता…
-
कोविड व्यवस्थापन, नियोजनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
प्रतिनिधी. पुणे - कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यू दर कमी…
-
कल्याणात बाइकर्सच्या स्टंटबाजीमुळे नागरीक त्रस्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - तरुणांमध्ये बाईक चालवण्याविषयी…
-
देशभर एकाचवेळी निवडणुका घेण्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीची प्राथमिक बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - देशात…
-
मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिका तसेच अन्य…
-
नाशिकच्या सायकलस्वारांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे २२ सायकलवीर देशाच्या राजधानीत…
-
केडीएमसीत कोरोना बाबतच्या उपाययोजनासाठी बैठक
प्रतिनिधी. कल्याण - मृत्युदर शुन्यावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया…
-
लोकसभा २०२४ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची बैठक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील…
-
पेन्शन व इतर मागण्यांसाठी कर्मचारी-शिक्षकांचे सह कुटुंब आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- १४ मार्च पासून २०…
-
कल्याण नगरीत "मराठी दिवाळी" साजरी
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दरवर्षी २७ फेब्रुवारी…
-
मंत्रीमंडळाची बैठक ही मंदिर विकास मंडळाची बैठक होती - दिपक केदार
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - राज्य मंत्रिमंडळाची…
-
वीज कंत्राटी कामगारांच्या प्रश्नी दोन दिवसात होणार बैठक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील महानिर्मिती महावितरण…
-
शेतकऱ्यांनी इतर खतांसोबत नॅनो युरियाचा वापर करावा; कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - चोपडा तालुक्यात…
-
दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यात…
-
कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर महत्वाची बैठक,लवकरच निघणार तोडगा
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवलीतील रिक्षा स्टँडबाबत अधिक तक्रारी आल्या असून…
-
कोकण रेल्वे मार्गाचे आणि इतर रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण
पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळुरू, कर्नाटक येथील…
-
विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बैठक
मुंबई प्रतिनिधी - राज्यातील सर्व नोंदणीकृत आस्थापना, कारखाने, कंपनी, संघटित असंघटित…
-
वंचित बहुजन युवा आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपन्न
प्रतिनिधी. अकोला - वंचित बहुजन युवा आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक…
-
आता रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री ११ पर्यंत सुरू राहणार
मुंबई/प्रतिनिधी- कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्बंध…
-
महावितरणच्या ‘प्रकाशगड’ मुख्यालयात आढावा बैठक
मुंबई/प्रतिनिधी - गेल्या दीड-दोन वर्षांपासून चक्रीवादळ, महापूर, कोरोनाचा प्रादुर्भाव अशा…
-
आपत्ती व्यवस्थापनाची मान्सूनपूर्व आढावा बैठक
प्रतिनिधी . मुंबई - सध्या आपण कोविडचा मुकाबला करीत असतांनाच येणाऱ्या…
-
कोरोनाविषयक खटले मागे घेण्याचा निर्णय,नोकरी,पासपोर्ट व इतर ठिकाणी पडताळणी मिळणार दिलासा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कोरोना काळातील प्रतिबंधात्मक आदेशांचे…
-
भिवंडी शिळ रस्त्या बाबत केडीएमसीत महत्वाची बैठक संपन
कल्याण प्रतिनिधी- भिवंडी ते शिळ या २१ किलोमीटर ४ पदरी रस्त्याचे…
-
कल्याण डोंबिवलीतील वाढता कोरोना प्रादुर्भाव, केडीएमसीत महत्वाची बैठक
कल्याण प्रतिनिधी- सध्या ज्या वेगाने कोरोना रुग्ण वाढत आहेत त्या…
-
आयटीआय मधील मुलींसाठी फ्लाइट प्रकल्प,कोडींग तसेच इतर सॉफ्ट स्किल्सचे मिळणार प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाचा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग आणि…
-
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची ३९वी बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची 39 वी…
-
विद्यार्थीनींनी बनवल्या पर्यावरणपूरक राख्या
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - वर्धा जिल्हातील…
-
आत्मभान अभियानाअंतर्गत मुलांसाठी कोरोना जनजागृती संदर्भात व्हिडिओ स्पर्धा
चंद्रपूर - नागरिकांना विशेषत: लहान मुलांना कोरोना विषयक जनजागृती व्हावी…
-
शेतकरी नेते व साखर कारखानदार यांच्यातील ऊस दराची बैठक निष्फळ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी - शेवगाव तहसील कार्यालय…
-
गणेशोत्सवाच्या प्रतीक्षेत, मुर्तीकार रंगरंगोटीत मग्न
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - गणेश उत्सव…
-
नवी दिल्लीत सागरी सीमेवरील बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी बैठक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारताच्या सागरी…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राबाबत मंत्रालयात आढावा बैठक
प्रतिनिधी. मुंबई - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरु करण्यात…
-
तीन बिबट्यांची करंट देऊन शिकार
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया / प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यातील…
-
ठाणे जिल्हा मान्सून तयारी आढावा बैठक
प्रतिनिधी . ठाणे - जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचे आकलन करून आपत्ती…
-
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद - येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य…
-
शोभायात्रेत केडीएमसी कडून स्वच्छतेबाबत जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नववर्ष दिनी अर्थातच गुढीपाडव्याच्या…
-
मुंबई विद्यापीठाच्या अस्थायी कामगारांच्या मागण्यावर महत्वपूर्ण बैठक संपन्न
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…
-
गडचिरोलीत कोरोना पार्श्वभूमीवर मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक
गडचिरोली/ प्रतिनिधी- पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा, बेड्सची…
-
कल्याणात प्लास्टिक वापरुन इंधनाची निर्मिती
प्रतिनिधी. कल्याण- रुद्र इन्व्हारमेंन्ट सोलुशन लिमीटेड आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त…