महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
राजकीय

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न

नेशन न्यूज मराठी टीम.

औरंगाबाद – येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर पक्षासोबत युती आघाडी करण्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष व त्या जिल्ह्याचे प्रभारी यांनी स्थानिक पातळीवर संबंधित पक्षाशी चर्चा करून युती-आघाडी करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य कार्यकारणी समोर ठेवावा असा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज औरंगाबाद मध्ये झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीत घेण्यात आला आहे.

औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणी बैठक पार पडली, या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून पक्ष यापुढे महाराष्ट्रात नव्या जोमाने सर्व निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी सांगितले.
सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहून दैनंदिन अडचणीत धावून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी मानून पक्ष यापुढे संघटनात्मक बांधणी साठी मैदानात उतरणार आहे. संघटनात्मक ऊर्जा व नियोजन यांची सांगड घालून पक्ष आता रचनात्मक काम घेऊन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपच्या सत्ता हस्तगत करण्याच्या भानगडीत महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्या जात आहेत. याकडे काँग्रेस लक्ष द्यायला तयार नाही किंवा राष्ट्रवादी लक्ष द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीत कोरोना नंतरची महाराष्ट्रातली परिस्थिती अतिशय भयावह आहे. वाढती महागाई रोजगाराचा बोजवारा वाजला शिक्षणाचा खेळखंडोबा झाला तरुणांना दिशाहीन केल्या जात आहे. नको त्या प्रश्नांवर तरुणांची माथी भडकवली जात आहेत, दर दिवसाला महाराष्ट्रातील या ना त्या कारणाने सरकारच्या माध्यमातून नवे वाद उत्पन्न केल्या जात आहेत व त्या वादामध्ये रोजगाराकडे अपेक्षेने बघणाऱ्या तरुणाला अडकवल्या जात आहे. महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर छोटा व मोठा व्यापारी आणि तरुण यांना सरकारने वार्‍यावर सोडले आहे भांडवलदार आणि उद्योगपतींना जवळ करून सर्व स्तरावरच्या प्रशासकांमार्फत महा विकास आघाडीचे लोक आपली स्वतःची घर भरत आहेत आणि जनतेच्या पैशाची लूट करत आहेत. अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी ने आता कंबर कसून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर मजबुतीने लढण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीसाठी अत्यंत चांगले वातावरण असून सर्व स्तरातील समाज घटकांना पक्षासोबत जोडून घेता आलं पाहिजे, पक्षाची भूमिका आणि रणनीती समजून घेतली पाहिजे पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता अपडेट व्हायला पाहिजे पक्षाने दिलेल्या कार्यक्रम तंतोतंत पणे खालच्या पातळीपर्यंत राबविण्यात यायला पाहिजे अशी भूमिका कार्यकारणी कडून यावेळी मांडण्यात आली. 

कुठल्याही क्षणी महाराष्ट्रात निवडणुका लागू शकतात तेव्हा सदरील निवडणुकांना कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्ष निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो सध्या महाराष्ट्रात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याग निष्ठा श्रम आणि जिद्द या सूत्रावर आधारित जर कार्यक्रम सुरू केला तर पक्ष सत्तेत जायला वेळ लागणार नाही याचाच भाग म्हणून पक्षाने नियुक्त केलेले सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांमध्ये सुसंवाद व समन्वय घडवून आणावा आणि प्रस्थापित धर्मवादी आणि जातीवादी पक्षांनी जी वंचितांची राजकीय लढाई संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला आहे त्याला तोडीस तोड उत्तर देऊन संघटनात्मक बांधणीवर पक्षाच्या सभासद नोंदणी वर प्रबुद्ध भारत च्या नोंदणी वर भर दिला पाहिजे जेणेकरून पक्षाचा सर्वसमावेशक जनाधार वाढेल. काळाची पावले ओळखून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता वागलं पाहिजे. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुठल्याही पक्षासोबत युती व आघाडी करण्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष व त्या जिल्ह्याचे प्रभारी यांनी प्राथमिक चर्चा करून युती व आघाडी करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य कार्यकारणी समोर ठेवावा तेव्हा त्यावर निर्णय घेता येईल अशी भूमिका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबाद मध्ये झालेल्या वंचित बहुजन आघाडी च्या राज्य कार्यकारिणीत मांडली.

याप्रसंगी राज्यातील अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली पक्षांतर्गत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले महत्वाचे धोरण निश्चित करण्यात आले नियोजन व रणनीती ठरविण्यात आली कामाची विभागणी करण्यात आली महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहणारा कार्यकर्ता केंद्रस्थानी मानून वंचित बहुजन आघाडी यापुढील वाटचाल चालणार आहे अशी भूमिका सुद्धा बैठकीत मांडण्यात आली याप्रसंगी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, पक्षाचे नेते अशोक सोनोने, किसन चव्हाण, धैर्यवर्धन पुंडकर, फारूक अहमद, अरुंधती शिरसाट, अनिल जाधव, सर्वजीत बनसोडे, प्रियदर्शी तेलंग, सिध्दार्थ मोकळे, नागोराव पांचाळ, गोविंद दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×