नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अहमदनगर/प्रतिनिधी- लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे चित्र आहे. नेतेमंडळी आपल्या प्रचाराच्या माध्यमातून सामान्य नागारिकांना मोठ-मोठी आश्वासने देताना दिसत आहेत.
दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी आ. निलेश लंके आणि भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखेंनी रणशिंग फुंकले आहे. नीलेश लंके यांना बळ देण्यासाठी रॅली काढण्यात आली. जोरदार शक्तीप्रदर्शनासह वाजत गाजत ही रॅली काढण्यात आली. मवियाच्या या रॅलित जेष्ठ नेते शरद पवार, आ.आदित्य ठाकरे, आ.रोहित पवार तसेच महाविकास आघाडीतील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
प्रचारदरम्यान रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले “शेतकऱ्यांसह, महिला,व्यापारी,इ घटकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. समाजातील ज्या घटकांना आज अडचणी आहेत ते सर्व घटक भाजपच्या विरोधात गेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला या लोकसभा निवडणुकीत कमीत कमी 35 जागांवर विजय मिळेल. भाजपची धोरणे ही कायम सर्वसामान्यांच्या हिताच्या विरोधात राहिलेली आहेत. त्यामुळे जनता आता त्यांच्या विरोधात आहे. तानाजी सावंत यांची आमदारकी धोक्यात येणार आहे. त्यांनी पाच ते साडेपाच हजार कोटींचा घोटाळा केलेला आहे” अशी जहरी टीका रोहित पवारांनी केली.