नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
बीड/प्रतिनिधी – वेगवेगळ्या नोकरभरती मध्ये नवनवीन घोटाळे समोर येत आहेत. हे प्रकार थांबवा आणि एमपीएससीच्या माध्यमातून सर्व परीक्षा घ्या या मागणीसाठी आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर युवकांचा विशाल मोर्चा धडकला आहे. वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करूनही घोटाळ्यामुळे पदरी निराशाच पडत असल्याचा संताप युवकांच्या मोर्चात दिसून आला.
सरकार वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून भरती करत असून हा प्रकार प्रामाणिकपणे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अन्याय करणारा आहे. यापुढे हे सर्व थांबवावे अन्यथा आम्ही मुंबईपर्यंत मोर्चा काढू असा इशारा देखील यावेळी विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे.